अवघ्या महाराष्ट्राची कलरफूल अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. मन धागा धागा जोडते नवा म्हणत पूजाने अवघ्या महाराष्ट्राच्या मनात घर केलं आहे. पूजाने बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणबरोबरचे फोटो शेअर करताच चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच नुकताच पूजाचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. काल म्हणजेच १६ फेब्रुवारी रोजी अगदी थाटामाटात पूजाचा सिद्धेशबरोबर साखरपुडा पार पडला.
साखरपुडा सोहळ्यासाठी अभिनेत्रीने हिरवी पैठणी साडी, नाकात नथ असा पारंपरिक लूक केला होता. तर, सिद्धेशने सोनेरी रंगाचा कुर्ता, पायजमा परिधान केला होता. पूजा व सिद्धेश दोघेही या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होते. पूजाचा हा साखरपुडा सोहळा संपन्न होताच तिच्या साखरपुड्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अशातच पूजाने नुकतेच तिच्या सोशल मीडियाद्वारे तिच्या या साखरपुडा सोहळ्याचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यात दोघेही एकमेकांकडून बघून क्युट स्माईल करताना पाहायला मिळत आहेत. तसेच पूजाने शेअर केलेल्या तिसऱ्या फोटोमध्ये त्यांचे पूर्ण कुटुंबही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – कुशल बद्रिकेची हिंदी मालिका लवकरच प्रदर्शित होणार, स्वतः व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “आशीर्वाद असुद्या…”
पूजा सावंतने काही दिवसांपूर्वीच रिलेशनशिपची घोषणा करत तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून अभिनेत्री लग्न केव्हा करणार? याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अशातच अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला आहे.
आणखी वाचा – औषधांचा दुष्परिणाम, आजार वाढला अन्…; गोळ्यांनीच घेतला ‘दंगल’मधील छोट्या बबिता फोगटचा जीव, नेमकं काय घडलं?
दरम्यान पूजाने हे फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी व चाहत्यांनी या फोटोला चांगलीच पसंती दर्शवली आहे. अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर अनेकांनी तिला अभिनंदन म्हणत साखरपुड्यानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.