शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२५ वर्षांनंतर नियती राजवाडेचं मालिकाविश्वात कमबॅक, ‘झी मराठी’ वाहिनीवरील नव्या मालिकेतून छोटा पडदा गाजवणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 3, 2025 | 10:48 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Niyati Rajwade New Serial

२५ वर्षांनंतर नियती राजवाडेचं मालिकाविश्वात कमबॅक, 'झी मराठी' वाहिनीवरील नव्या मालिकेतून छोटा पडदा गाजवणार

Niyati Rajwade New Serial : मराठी मालिकाविश्व आणि येथील कलाकार मंडळी यांचं प्रेक्षकांशी अतूट नातं असलेलं पाहायला मिळतं. मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम करत ही कलाकार मंडळी रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करतात. मात्र बरेचदा आर्थिक, कौटुंबिक अडचणींमुळे ही कलाकार मंडळी वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करत अभिनयातून ब्रेक घेतानाही दिसतात. असं असलं तरी त्यांचं अभिनयाप्रती असलेलं प्रेम काही केल्या कमी होत नाही. त्यांच्यातील अभिनय हा नेहमीच त्यांना उत्स्फूर्त करताना दिसतो. बरेचदा अनेक वर्षांनी ही कलाकार मंडळी रसिकांच्या भेटीस येत त्यांची मन जिंकताना दिसतात.

अशातच तब्बल २५ वर्षांनी एक मराठमोळी अभिनेत्री मालिकाविश्वात पदार्पण करणार असल्याचं समोर आलं आहे. ही अभिनेत्री म्हणजेच नियती राजवाडे नाटक, मालिका व काही चिटपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे नियती राजवाडे. नियती यांनी केवळ मालिकांमध्येच नव्हे तर रिअ‍ॅलिटी शोमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. नियती यांनी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘कॉमेडी एक्सप्रेस’ तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या मराठी विनोदी कार्यक्रमांमधूनही प्रेक्षकांना हसवण्याचे काम केलं आहे.

आणखी वाचा – “तिच्याशिवाय घर खायला उठायचं”, शेफाली जरीवालाच्या आठवणीत पती झालेले भावुक, म्हणालेले, “तिची खरी किंमत…”

View this post on Instagram

A post shared by Niyati Rajwade (@rajwadeniyati)

मालिकाविश्वातील ही अभिनेत्री आता पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर तब्बल २५ वर्षांनी पुन्हा येत आहे. झी मराठी वाहिनीवर लवकरच सुरु होणाऱ्या नव्या मालिकेतून ती छोट्या पडद्यावर परतत आहे. मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा अभिनेत्री शिवानी सोनार मुख्य भूमिकेत असलेली ही मालिका असून यांत नियती राजवाडेही सहकलाकाराच्या भूमिकेतून भेटीस येणार आहे. आता या मालिकेत नियती कोणत्या भूमिकेत दिसणार?, तिची भूमिका नेमकी काय असणार आहे?, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा – डोक्यात हवा गेली, चॅनेलने बाहेर काढलं अन्…; प्रसिद्ध राशिचक्रकारांचा निलेश साबळेंना टोला, म्हणाले, “सर्वनाश होतो आणि…”

आजवर नियतीने ‘लबाड कुठली’, ‘लंडनचा जावई’, ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटांमधून महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ‘लेक माझी दुर्गा’, ‘खरंच तिचं काय चुकलं’, या मालिकांमधूनही नियतीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आणि आता नियती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर महत्त्वपूर्ण भूमिकेतून तब्बल २५ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Tags: marathi actressnew serialNiyati Rajwade
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Shefali Jariwala Prayer Meet

शेफाली जरीवालाच्या शोकसभेत ढसाढसा रडले वडील, सासऱ्यांना सांभाळत राहिला पराग त्यागी, भावुक Video Viral

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.