Neha Gadre Welcomes Baby Boy : सध्या सिनेविश्वात अनेक कलाकार मंडळी चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर करत आहेत. अशातच आता मराठी सिनेविश्वातील आणखी एका अभिनेत्रीने आई झाली असल्याची खुशखबर सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत दिली आहे. ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे. मराठी मनोरंजन विश्वातून गेल्या काही वर्षांपासून गायब झालेली अभिनेत्री नेहा आता आई झाली आहे. स्टार प्रवाहच्या गाजलेल्या ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेतून ती लोकप्रिय झाली आणि घराघरात पोहोचली. नेहाने आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह सोशल मीडियावरुन दिली होती. इतकंच नाही तर ती प्रेग्नन्सीच्या अनेक अपडेट चाहत्यांसह वेळोवेळी शेअरही करताना दिसली. अभिनेत्री सध्या भारतात नसून ऑस्ट्रेलिया येथे स्थित आहे.
काही दिवसांपूर्वीच नेहाने ही आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. त्यानंतर तिच्या थाटामाटात झालेल्या डोहाळजेवण समारंभाची झलकही तिने शेअर केली होती. या खास समारंभाला अभिनेत्री सुकन्या मोनेही ऑस्ट्रेलियात पोहोचल्या होत्या. लग्नानंतर अभिनय सोडून नेहा नवऱ्याबरोबर कायमची ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाली. यानंतर आता लग्नाच्या पाच वर्षांनी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला आहे. नेहाने चिमुकल्या बाळाला जन्म दिला आहे. नेहाला मुलगा झाला आहे.

आई झाल्याची गोड बातमी तिने चाहत्यांसह सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. १० फेब्रुवारीला नेहाने तिच्या बाळाचं स्वागत केलं. पोस्ट शेअर करत नेहाने तिच्या बाळाचं नाव देखील सर्वांना सांगितलं आहे. तिने तिच्या बाळाचं नावं इवान असं ठेवलं आहे. “वेलकम टू द वर्ल्ड बेबी इवान” अशी पोस्ट शेअर करत नेहाने ही आनंदाची बातमी तिच्या सर्व चाहत्यांना दिली आहे. नेहाच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाकार मंडळींनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
नेहाने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर बेबी बंपसह फोटो शूट केलं होतं. आई होणार असल्याच्या गोड बातमीबरोबर तिने बाळाचं जेंडर रिव्हिल सुद्धा केलं होतं. बाळाच्या जन्माआधी लिंग चाचणी करणं भारतात बेकायदेशीर आहे पण, विदेशात याला परवानगी आहे. त्यामुळे नेहाला आधीच मुलगा होणार की मुलगी हे समजलं होतं. जेंडल रिव्हिल केल्यावर नेहाला तिला मुलगा होणार असल्याची बातमी मिळाली.