Radhika Apte Troll : गेल्या वर्षी २०२४ मध्ये अभिनेत्री राधिका आपटे आई झाली. तिने तिच्या बाळाबरोबर फोटो पोस्ट केले आणि गर्भधारणेबद्दल बरेच काही सांगितले होते. पुन्हा एकदा, आता अभिनेत्रीने स्तन पंप करताना फोटो शेअर केले आहेत. अशी बातमी आहे की राधिका आपटेने बाफ्टा पुरस्कारांमध्ये हजेरी लावली आहे, तर बाळ फक्त दोन महिन्यांचा आहे. १८ फेब्रुवारी रोजी अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो बाथरुममधील आहेत. तिने हे फोटो शेअर करत असं म्हटलं की, “आणि आता माझ्या बाफ्टाचे वास्तव पहा. मी नताशाचे आभार मानते, ज्यामुळे मी येथे येऊ शकले. तिने माझ्या ब्रेस्ट पंपिंगच्या वेळेनुसार हा कार्यक्रम शेड्यूल केला. ती फक्त माझ्याबरोबर दूध काढण्यासाठी वॉशरूममध्ये गेली नाही. त्याऐवजी ती माझ्यासाठी शॅम्पेन घेऊन आली”.
राधिका आपटेने पोस्टमध्ये पुढे लिहिले, “आई होणे आणि काम करणे कठीण आहे. या पातळीची काळजी आणि संवेदनशीलता आमच्या चित्रपटसृष्टीत खूपच कमी आहे आणि त्याचे कौतुक केले जाते”. अभिनेत्रीच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी टिप्पणी विभागात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावेळी काहींनी अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे आणि काहींनी शॅम्पेनवर मत मांडलं आहे.
अमृता सुभाष आणि अलेक्झांडर खेर यांनी हार्ट इमोजीद्वारे प्रेमाचा वर्षाव अभिनेत्रीवर केला आहे. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “राधिका मॅम तुम्ही खूप चांगल्या आहात. पण त्या ग्लासमध्ये जे काय आहे ते करु नका?. प्रत्येक आईचा अभिमान वाटतो. खूप प्रेम”. तर एकाने लिहिले आहे की, “हे वाईट आहे की २०२५मध्येही तुम्हाला बाथरूममध्ये पंप करावे लागत आहे”. तर एकाने लिहिले, “बरं, स्तनपान करवण्याच्या वेळी प्यायला जाऊ नये”. तर एकाने सल्ला देत म्हटलं की, “मला माफ करा पण राधिका या पोस्टद्वारे चुकीचे संदेश देत आहेस. स्तनपान देताना पिणे योग्य नाही”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली आई, लग्नाच्या पाच वर्षांनी दिली गुडन्यूज, नावही ठेवलं फारच खास
आई झाल्यानंतर एका मुलाखतीदरम्यान राधिका म्हणाली होती की, “हा एक वेडेपणा आहे. मला हे सार्वजनिक करायचे नाही. पण हे नक्की कसं काय झालं? हा एक विनोदच आहे. ही काही दुर्घटना नव्हती. पण आम्ही बाळासाठी प्रयत्नदेखील करत नव्हतो. आमच्यासाठीदेखील हा एक धक्का होता”. नंतर ती म्हणाली की, “मला वाटत की ज्या लोकांना मूल हवं की नाही? हे माहीत असतं तेव्हा या सगळ्या गोष्टी सोप्या असतात. पण आम्हाला बाळाची अपेक्षा नव्हती. पण हे सगळं कसं होणार याबद्दलची उत्सुकता मात्र होती. त्यांनंतर आम्ही पुढे प्रयत्न करण्यास काहीही हरकत नाही असा विचारदेखील केला”.