यंदाची दिवाळी सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारांसाठी देखील खास आहे. यंदाच्या दिवाळीला मराठीतील अनेक कलाकारांनी जोरदार खरेदी केली. कुणी गाडी, कुणी घर, तर कुणी काही वस्तु घेत यंदाची दिवाळी जोरदार साजरी केली. अशातच मराठीतील प्रसिद्ध कलाकार जोडी सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांनीही एकमेकांना भेटवस्तू देत यंदाची दिवाळी अगदी धुमधडक्यात साजरी केली आहे.
सिद्धार्थ-मिताली ही जोडी सोशल मीडियावर काहीना काही कारणास्तव कायम चर्चेत असतात. यावरून त्या दोघांमधील चांगलं बॉण्डही दिसून येतो. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर काल नवी कोरी आलिशान कार खरेदी केल्याची बातमी त्यांच्या चाहत्यांसह शेअर केली होती. यावेळी मितालीने “माझी लक्ष्मी आली” असं म्हणत या कारबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यानिमित्ताने दोघांनी पारंपरिक लूक परिधान करत सर्वांचे लक्ष वेधलं होतं. तिच्या या व्हिडीओखाली मराठी कलाकारांसह चाहत्यांनी ही दोघांचं अभिनंदन केलं.
अशातच आता सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याच्या हातात राडोचं (rado) महागडं घडयाळ दिसत आहे. या घड्याळाची किंमत जवळपास लाखोंच्या घरात आहे. अर्थातच काल पाडव्याच्या निमित्ताने मितालीने त्याला हे महागडं घडयाळ गिफ्ट म्हणून दिलं आहे. या व्हिडीओखाली सिद्धार्थने “Wifey has no chill. मी अजूनही थरथरत आहे” असं हटके कॅप्शन देत हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, त्याच्या या व्हिडीओखाली सायली संजीव, आरोह वेलणकरसारख्या कलाकारांनी त्याचबरोबर अनेक चाहत्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – “एक किलो वजनही वाढलं अन्…”, दिवाळीला घरी गेलेल्या प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “भाच्यांना…”
दरम्यान सिद्धार्थ-मिताली यांनी नुकतीच काल नवी कोरी आलिशान कार खरेदी केल्याची बातमी शेअर केली आणि आता त्याने या महागड्या घड्याळाचा व्हिडीओ शेअर केला आहे.त्यामुळे ही जोडी चर्चेत आली आहे. त्याचबरोबर २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘झिम्मा २’ या चित्रपटासाठीही सिद्धार्थचे चाहते आतुर आहेत.