रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चाहत्यांच्या गर्दीत अभिनेत्रीबरोबर गैरव्यवहार, धक्काबुक्की अन्…, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “लाज बाळगा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 18, 2025 | 4:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nidhi Agarwal Video Viral

चाहत्यांच्या गर्दीत अभिनेत्रीबरोबर गैरव्यवहार आणि धक्काबुक्की

Nidhi Agarwal Video Viral : हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निधी अग्रवाल हिच्याबरोबर नुकताच एक अत्यंत अस्वस्थ करणारा आणि धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार अभिनेता प्रभास यांचा चित्रपट ‘द राजा साब’ मधील ‘सहना सहना’ या गाण्याच्या लॉँच इव्हेंटदरम्यान घडला आहे, सध्या यावर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. निधी अग्रवाल ही गाण्याच्या लॉँच कार्यक्रमाला उपस्थित होती. कार्यक्रम पार पडल्यानंतर ती बाहेर पडत असताना चाहत्यांनी तिच्याभोवती अचानक मोठी गर्दी केली.

सेल्फी घेण्याच्या नादात अनेक जण तिच्या अगदी जवळ येऊ लागले. काही क्षणांतच परिस्थिती इतकी बिघडली की निधी अग्रवाल गर्दीत अडकली. इतकी गर्दी होती की तिला पुढे जाण्याचा मार्ग देखील दिसत नव्हता. या संपूर्ण प्रसंगात निधीसह बॉडीगार्ड उपस्थित असतानाही, गर्दीवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं होतं. चाहत्यांकडून धक्काबुक्की, जवळ येणं आणि सतत सेल्फी काढण्याचे प्रयत्न सुरू होते. निधीने ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला होता आणि त्या गोंधळात ती आपला ड्रेस सावरत, प्रचंड अस्वस्थ अवस्थेत गाडीपर्यंत पोहोचताना दिसली. अखेर बॉडीगार्डनी तिला सुरक्षितपणे गाडीत बसवलं.

आणखी वाचा – “सेटवर कोणत्या गाडीतून उतरताय हे पहिलं पाहतात”, सिनेइंडस्ट्रीच्या वास्तवाबाबत अर्चना पाटकर स्पष्टचं म्हणाल्या, “घरी उपाशी असलो तरी…”

View this post on Instagram

A post shared by Aravind Journo (@aravind__info)

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. “ती किती अनकंफर्टेबल आहे हे स्पष्ट दिसतंय”, “हे चाहते नाहीत, ही असभ्यता आहे”, “थोडी लाज बाळगा” अशा अनेक संतप्त प्रतिक्रिया कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहेत. चाहत्यांचा उत्साह आणि गर्दी यामुळे हा प्रसंग अधिक गंभीर बनल्याचं स्पष्ट होत आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा सेलिब्रिटींच्या सुरक्षिततेचा आणि वैयक्तिक मर्यादांचा प्रश्न चर्चेत आला असून, चाहत्यांनी जबाबदारीने वागणं गरजेचं असल्याचं अनेकांनी अधोरेखित केलं आहे.

आणखी वाचा – लोकप्रिय अभिनेते लवकरच होणार आजोबा, लेकीचं थाटामाटात केलं डोहाळ जेवण; फोटो समोर

Tags: bollywood newsentertainmentnidhi agarwalNidhi Agarwal Video Viral
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Tharal Tar Mag New Promo

‘ठरलं तर मग’मध्ये मोठा TWIST, २२ वर्षांपूर्वीच्या अपघाताचं सत्य उघड; प्रोमो पाहून नेटकरी खुश, म्हणाले, "नशीब आता तरी सत्य कळेल…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.