शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पुराव्याशिवाय नाव घेऊ नका आणि…”, प्राजक्ता माळीच्या बदनामीवर मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “उगीच टीका करत…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 30, 2024 | 3:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Megha Dhade shared a special video supporting Prajakta Mali and said that all this is very objectionable.

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा प्राजक्ता माळीला पाठींबा, निषेधार्थ शेअर केला विशेष व्हिडीओ

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांच्या नावाचा उल्लेख केला. यानंतर संतापलेल्या प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत घडलेल्या घटनेचा खेद व्यक्त केला. तसंच सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली आणि महिला आयोगाकडे तक्रारही दाखल केली आहे. या प्रकरणानंतर मराठी कलाकार प्राजक्ताच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत प्राजक्ताला पाठिंबा दिला आहे. अभिनेता कुशल बद्रिके, अभिनेत्री विशाखा सुभेदार, लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी, तसंच निर्माते नितीन वैद्य यांनी प्राजक्तासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर आता अभिनेत्री मेघा धाडेनेही प्राजक्ताला व्हिडीओद्वारे पाठिंबा दिला आहे. (megha dhade supported prajakta mali)

या व्हिडीओमध्ये मेघा धाडेने असं म्हटलं आहे की, “नमस्कार मी मेघा धाडे. आज तुमच्या पुढे मी माझं मत व्यक्त करायला आले आहे. ते मत व्यक्त करणं ही माझी जबाबदारी समजते. एक स्त्री म्हणून, एक महिला कलाकार म्हणून मी माझं कर्तव्य समजते की, याबद्दल मी बोललं पाहिजे. ते म्हणजे आमची एक जवळची मैत्रीण आहे. ती उत्तम अभिनेत्री आहे, जिच्या कामाचं तुम्ही नेहमी कौतुक केलं आहे. जिचं काम, जिची कर्तबगारी अतिशय वाखणण्याजोगी आहे. गेल्या १० वर्षांत जे काही त्या मुलीने स्वतःच्या हिंमत करून दाखवलं आहे. जे तिने स्वतःचं विश्व निर्माण केलं आहे. ते कौतुक करण्यासारखं आहे. हेवा वाटण्यासारखं आहे. तिचं नाव म्हणजे प्राजक्ता माळी”.

यापुढे मेघा म्हणाली की, “जे अशी टिपण्णी करतात आणि स्वतःसाठी दुसऱ्यांच्या नावाचा उपयोग करून त्या अब्रुवर शिंतोडे उडवून स्वतःचे उल्लू सिधे करून घेण्याचं जो काही त्यांचा एक केविलववाणा प्रयत्न असतो. तो त्यांना खरंतर त्यांची मानसिकता दाखवतो. कारण खऱ्या आयुष्यात जे पुरुषला जमणार नाही, अशी तू कर्तबगारी दाखवली आहेस. एकहाती कुटुंबाचा आधार घेत जे तू काही केलं आहेस ते प्रत्येकाला जमण्यासारखं नाही. तुझा हेवा वाटण्यासारखंच तुझं काम आहे. त्यामुळे तू सोम्या-गोम्यांच्या फालतू टिपण्यांमुळे व्यथित होऊ नकोस. तुझं काम, तुझं चारित्र्य आणि तू आजवर केलेले कष्ट हे सूर्यप्रकाशासारखे लख्ख आहे”.

View this post on Instagram

A post shared by Megha Dhade (@meghadhade)

यापुढे मेघाने म्हटलं की, “मी त्या राजकारण्यांना सांगू इच्छिते, तुम्ही एका स्त्रीला वेठीशी धरून तिचं नाव घेऊन त्यांचं वर्णन तुम्ही करत होता, ते त्यांचं वर्णन केलं नसून तुम्ही तुमच्या मानसिकतेचं वर्णन केलं आहे. तुमच्या कुचक्या मानसिकतेचं वर्णन तुम्ही केलं आहे. तेव्हा यापुढे कुठल्याही स्त्रीबद्दल बोलताना हाही विचार करा, तुमच्याही घरात आई-बहिणी आहेत. हा महाराष्ट्र तुम्हाला बघत आहेस, तुम्ही जे काही बोलत आहात, जी काही कृती करत आहात, जी काही टीका-टिपण्णी करत आहात ते आम्ही सगळे बघत आहोत. यातून तुम्ही दुसऱ्या कुणाचे तरी नाव बदनाम करण्यापेक्षा स्वत:चीच प्रतिमा डागाळत आहात. कारण तुम्ही नावे घेतलेल्यांनी त्यांची कर्तबगारी दाखवली आहे. ज्यांची नावे घेत आहात त्या काय रस्त्यावर पडलेल्या नाहीत.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लगीनघाई!, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, पारंपरिक लूकमध्ये नटली नवरी

यानंतर मेघाने असं म्हटलं आहे की, “हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात स्त्रियांना आदर मिळालाच पाहिजे. या पद्धतीची वागणूक ही अतिशय निषेधार्थ आहे. ज्यांनी ज्यांनी प्राजक्ताचे नाव उगाच यात गोवलं आहे. किंवा तिच्याबद्दल जे जे लोक खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. टीआरपी, व्ह्यूज आणि लाईक्स वाढवण्यासाठी जे जे प्राजक्ताच्या नावाचा वापर करत आहेत, त्या सर्वांचा तीव्र निषेध आहे. तुम्हा सर्वांची कीव येत आहे. एका स्त्रीचं चरित्र हणन करुन तुम्ही तुमचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत आहात”.

आणखी वाचा – मल्याळम अभिनेते दिलीप शंकर यांचा संशयास्पद मृत्यू, हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

यापुढे मेघाने करुणा मुंडेंबद्दल असं म्हटलं की, “तुमची जी काही भांडणे आहेत ती आपसातली आहेत. त्यात तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी आणण्याची काहीही आवश्यकता नाही. तुमचं तुमच्या नवऱ्याबरोबर जे काही भांडण आहे ते त्यांच्याबरोबर निस्तारा. त्यात दुसऱ्यांनची नावे घेऊन त्यांना उगाच बदनाम करु नका. पुराव्याशिवाय त्यांची नावे घेण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही”.

 

Tags: megha dhade on prajakta malimegha dhade supported prajakta maliprajakta mali news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
pankaja munde on prajakata mali

"नुसती चिखलफेक, दुर्देवाने…", प्राजक्ता माळीला पंकजा मुंडेंचा मोठा पाठिंबा, म्हणाल्या, "प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.