बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चर्चेत असते. दूरदर्शनवरील ‘शांतीच्या’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवले. तसेच ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटामध्ये छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती २००३ साली पाहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तिने पहिल्यांदाच महिला समालोचक म्हणून प्रेक्षकांच्या समोर आली. पण त्यावेळी ती समालोचनापेक्षा तिच्या वेषभुशेमुळे अधिक चर्चेत राहिली. त्यानंतरही ती काही चित्रपट व कार्यक्रमांमध्ये दिसून आली होती. आता पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे ती चर्चेत आली आहे. (mandira bedi on plastic surgery)
मंदिरा आपल्या सोशल मीडियावर फिटनेस संदर्भात काही पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यामुळे ती आता ट्रोल झाली आहे. तिने आपल्या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वाढत्या वयाबरोबर आरोग्य व जेवण कसे सेवन करावे याबद्दल ती सल्ला देत होती. पण लोकांनी तिचे बोलणे ऐकण्याऐवजी तिच्या चेहऱ्यावरच नेटकऱ्यांचे अधिक लक्ष होते. यावर तिने लिप सर्जरी केली आहे का असा प्रश्नदेखील विचारला आणि तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले.
आता या ट्रोलिंगवर मंदिराने सणसणीत उत्तर दिले आणि तिने सर्व नेटकऱ्यांची बोलती बंद केली आहे. याबाबत तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने सर्व बाजूनी आपला चेहरा दाखवत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी सर्व बाजूंनी माझा चेहरा दाखवला आहे. हा फिल्टर आहे, फिलर नाही”. तसेच ही पोस्ट करताना तिने ‘कुछ तो लोंग कहेंगे लोगो का काम है कहना’ हे गाणं बॅकग्राऊंडला लावले आहे.
मंदिराची ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. अनेक जण तिला सपोर्ट करतानादेखील दिसत आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले की, “तुम्हाला ट्रोल करणारे लोक कुठे गेले? आता सगळ्यांची बोलती बंद झाली”. अशा प्रकारे अनेकांनी तिला पाठिंबा दिलेला दिसून येत आहे.
सध्या मंदिरा जास्त कोणत्याही कार्यक्रमांत दिसून येत नाही. २०२१ साली तिचा पती राज कौशलचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर ती पूर्णपणे कोलमडली होती. सध्या ती तिच्या मुलांचा एकटी सांभाळ करत आहे.