शनिवार, डिसेंबर 2, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory

Home - Goa International Film Festival 2023 : माधुरी दीक्षितचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये विशेष पुरस्काराने सन्मान, भारावून गेली अभिनेत्री

Goa International Film Festival 2023 : माधुरी दीक्षितचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये विशेष पुरस्काराने सन्मान, भारावून गेली अभिनेत्री

Kshitij LokhandebyKshitij Lokhande
नोव्हेंबर 21, 2023 | 1:56 pm
in Bollywood Gossip
Reading Time: 2 mins read
Madhuri Dixit awarded 'Special Recognition for Contribution to Indian Cinema' in IFFI Goa 2023

Goa International Film Festival 2023 : माधुरी दीक्षितचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये विशेष पुरस्काराने सन्मान, भारावून गेली अभिनेत्री

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अशी ओळख असलेली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षितने हिंदी चित्रपटसृष्टीत मोठं योगदान दिलं आहे. कधी ‘मोहिनी’, तर कधी ‘चंद्रमुखी’ची भूमिका साकारत जगभरातील प्रेक्षकांना आपलंसं केलं. अभिनयाबरोबर ती उत्तम नृत्यांगणा देखील असून तिच्या प्रत्येक नृत्य कौशल्याने अनेकदा रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शिवाय, तिच्या सौंदर्याने जगभरातील चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे. तिची ही क्रेझ आजच्या पिढीतही पाहायला मिळत आहे. अश्या या अभिनेत्रीला गोवा येथील ५४व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एका विशेष पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलं. (Madhuri Dixit awarded ‘Special Recognition for Contribution to Indian Cinema’ in IFFI Goa 2023)

गोवा येथे ५४व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली असून केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते माधुरीला ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानासाठी विशेष सन्मान’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यासंबंधीची एक पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.

हे देखील वाचा – “सत्यनारायणाची पूजा, औक्षण, पाहुणचार अन्…”, अमृता देशमुखच्या माहेरी नव्या जोडप्याचं असं झालं स्वागत, लग्नानंतरचे फोटो आले समोर

Elated and Honoured to present the award of
Special Recognition for Contribution to Bharatiya Cinema to the iconic and unmatched Madhuri Dixit ji.

Her performances have enamoured generations of Cinephiles and she continues to enthral cinema lovers with the magnificence of her… pic.twitter.com/v8OvM30zlp

— Anurag Thakur (@ianuragthakur) November 20, 2023

दरम्यान, याआधी मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटद्वारे ही घोषणा केली असून त्यात त्यांनी अभिनेत्रींचे कौतुक केले होते. या ट्विटमध्ये ते म्हणाले, “माधुरी दीक्षितने ४ दशकांच्या अविश्वसनीय कारकिर्दीत आपल्या उत्तम अभिनय व प्रतिभेने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. तेजस्वी ‘निशा’पासून ते मनमोहक अशा ‘चंद्रमुखी’पर्यंत, ‘बेगम पारा’पासून ते ‘रज्जो’ पर्यंत तिच्या अष्टपैलू अभिनयाला कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळेच आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या प्रतिभावान अभिनेत्रीला ‘भारतीय चित्रपटातील योगदानासाठी विशेष सन्मान’ हा पुरस्कार प्रदान करत आहोत.”

हे देखील वाचा – Emmy International Awards 2023 : वीर दासने आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरत रचला इतिहास, एकता कपूरला विशेष पुरस्काराने केले सन्मानित

An icon across the ages, @MadhuriDixit has graced our screens with unparalleled talent for four incredible decades.

From the effervescent Nisha to the captivating Chandramukhi, the majestic Begum Para to the indomitable Rajjo, her versatility knows no bounds.

Today, we are… pic.twitter.com/HlYUWHsWRY

— Anurag Thakur (@ianuragthakur) November 20, 2023

माधुरीने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यात ‘हम आपके है कौन’, ‘दिल तो पागल है’, ‘खलनायक’, ‘देवदास’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. या सर्वच चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्याचबरोबर, ती चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरली असून तिने निर्मित केलेला ‘पंचक’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: bollywood actressGoa International Film FestivalIffi Goamadhuri dixitMadhuri Dixit awarded 'Special Recognition for Contribution to Indian Cinema' in IFFI Goa 2023

Latest Post

actor prashant damle shared some memories about his married and professional life in interview
Marathi Masala

“वर्षा उसगांवकरला उचलून घेतलं तेव्हा…”, पत्नीबाबत खुलेपणाने बोलताना प्रशांत दामलेंनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाले, “तिला असुरक्षित वाटणं…”

डिसेंबर 2, 2023 | 7:54 pm
(actress prarthana behere shared video of her new office pooja on instagram account
Marathi Masala

Video : आधी प्रार्थना बेहरेने आलिबागमध्ये बांधलं आलिशान फार्महाऊस, आता खरेदी केलं नवीन ऑफिस, नवऱ्यासह पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल

डिसेंबर 2, 2023 | 6:46 pm
Alia bhatt share a post for ranbir and raha
Bollywood Gossip

रणबीर कपूर-आलिया भट्टच्या लेकीने टाकलं पहिलं पाऊल, अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत नवऱ्याचंही केलं कौतुक, म्हणाली, “आमच्या मुलीला…”

डिसेंबर 2, 2023 | 5:55 pm
actor ramesh deo talk about his father ramesh deo and seema deo
Marathi Masala

“त्यांना चालताही येत नव्हतं अन्…”, वडील रमेश देव यांच्या शेवटच्या क्षणांबाबत अजिंक्य देव यांचा खुलासा, म्हणाले, “तरीही शूटला गेले आणि…”

डिसेंबर 2, 2023 | 5:45 pm
Next Post
Ajay Devgan Singham Again first look out

डोळ्यात राग, आक्रमक अंदाज अन्…; अजय देवगणचा 'सिंघम अगेन'मधील फर्स्ट लूक अखेर समोर, चाहतेही भारावले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist