अभिनेत्री लैला खान व तिच्या कुटुंबियांची २०११ साली हत्या झाली होती. या प्रकरणातील मोठी अपडेट आता समोर आली आहे. या खुना प्रकरणी तिच्या तिच्या सावत्र वडिलांना दोषी ठरवण्यात आले आहे. तब्बल १३ वर्षानंतर तिला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या लैलाची तिच्या कुटुंबीयांची सावत्र वडिलांनी हत्या केली होती. त्यावेळी लैला केवळ ३० वर्षाची होती.त्यामुळे या प्रकरणी आता आरोपी परवेझ टाकला अटक करण्यात आली. गेल्या १२ वर्षांपासून तुरुंगातच होता. (actress laila khan death)
‘इंडियन एक्सप्रेस’च्या रिपोर्ट्सनुसार, आरोपी परवेझला १४ मे रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणात न्यायालय आता अंतिम सुनावणी करणार आहे. तसेच या प्रकरणातील अजून एक आरोपी फरार असून त्याचा तपास पोलिस करत असल्याचेही समजत आहे.

लैलाने आजपर्यंत बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना यांच्याबरोबरच इतर अभिनेत्यानंबरोबरही काम केले आहे. २०११ साली लैला आई शेलिना पटेल व चार भावंडांनाबरोबर गायब झाली होती. गायब झाल्यानंतर वडील नादिर पटेल यांनी पोलिसांमध्ये संपर्क केला. त्यानंतर काही महीने तपास केल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या नाशिक येथील फार्महाऊसबद्दल समजले होते. हे फार्महाऊस अर्धे जळाले होते. या फार्महाऊसचीदेखील तपासणी सुरु झाली होती.
पोलिसांनी जेव्हा तपास सुरु केला तेव्हा लैलाचे शेवटचे लोकेशन नाशिकमध्ये आढळून आले. त्यामुळे ती शेवटची नाशिकमध्ये असल्याचे समजले. त्यानंतर तपास केला आणि तेव्हा सगळा संशय तिच्या सावत्र वडिलांवर गेला. त्यांची गाडीदेखील जम्मू-कश्मीर येथे सापडली. त्या ठिकाणी परवेझचा संबंध होता. तसेच परवेझ हा शेलिनचा तिसरा पती होता असेही माहितीत समोर आले.
समोर आलेल्या माहितीनुसार, इगतपुरी येथील बंगल्यामध्ये संपत्तीवरुन खूप भांडणे झाली होती. त्यानंतर परवेझने शेलिनची हत्या केली. त्यानंतर लैला, तिची मोठी बहीण अमिना, जुळी भावंड झारा व इमरान, चुलत बहीण रेश्मा यांची हत्या केली. त्यांचे मृतदेह फार्महाऊस येथे पुरले.