Kranti Redkar Talk About Sameer Wankhede सिनेसृष्टीतील अनेक जोड्या चर्चेत असतात.अशीच चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर व सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची. क्रांती व समीर वैयक्तिकरित्या विशेष चर्चेत असतात.परंतु सध्या त्यांची लव स्टोरी आणि त्यांचे विविध किस्से चर्चेत आहेत.सरकारी अधिकारी असताना देखील अभिनेत्री सोबत लग्न कसं झालं याबाबत सांगताना समीर वानखेडींनी त्यांच्या लव स्टोरीबद्दल सांगितलं.(Kranti Redkar Talk About Sameer Wankhede)
समीर व क्रांतीने वेगवेगळ्या पद्धतीत लग्न केलं होतं, त्यांच्या मुलींच्या नावा मागची गोष्ट अनेक किस्से सध्या समोर आले.समीर त्यांच्या कामामुळे अनेकदा घरातल्या अनेक कार्यक्रमांना हजर नसायचे, याबाबत बोलताना समीर म्हणाले,”आता मी माझ्या मुलींना वेळ देत आहे. पण, एकेकाळी मी रात्री उशिरा घरी यायचो तेव्हा त्या झोपलेल्या असायच्या आणि सकाळी त्या उठायच्या आधीच मी कामासाठी घराबाहेर पडायचो. कधी कधी क्रांतीला ही भेटणं शक्य व्हायचं नाही. पण तिने कधीही मला वेळ देत नाही अशी तक्रार केली नाही.अनेक कार्यक्रमांना मला हजर राहणं शक्य व्हायचं नाही. आम्ही लग्नाचा पहिला वाढदिवस देखील साजरा केला नव्हता.”
पाहा काय म्हणाली क्रांती रेडकर?(Kranti Redkar Talk About Sameer Wankhede)
या किस्स्यानंतर क्रांती म्हणाली,”आमच्या लग्नाच्या रिसेप्शनला समीर फक्त तीन तास उपस्थित होते.ते आले, थोडावेळ स्टेजवर बसले आणि निघून गेले. फुलांनी सजवलेल्या गाडीतून मी एकटीच घरी गेले होते. आम्ही असं जीवन जगतो. पण, या सर्व गोष्टींनंतर जेव्हा तुम्हाला ट्रोल केलं जात, तेव्हा खूप वाईट वाटत.पण या गोष्टींकडे दुर्लक्ष करणंच योग्य आहे.”
हे देखील वाचा: अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडेंनीच सांगितली लव्हस्टोरी, म्हणाले,”ती माझी…”
क्रांती व समीर यांचा प्रेमविवाह आहे. समीर म्हणाले,”लोकांना माहीत नाही की ती माझी जुनी मैत्रीण आहे. आम्ही रुईया कॉलेजमध्ये एकत्र होतो. तेव्हापासून मी तिला आवडायचो, नंतर आम्ही लग्न केलं,” असं समीर यांनी सांगितलं. ‘तुम्ही कॉलेजमध्ये तिला प्रपोज केलं नाही का?’ असं विचारलं असता समीर म्हणाले, “नाही, इगो इश्यूज असतात ना, त्यामुळे मी अप्रोच केलं नाही. पण मलाही ती आवडायची. मग तिनेच मला विचारलं. मलाही तिच्याशी लग्न करायचं होतं.”(kranti sameer love story)