मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने साकारलेल्या विविध भूमिकेला प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. सध्या ती अभिनयापासून लांब असली तरीही तिचा मनोरंजनसृष्टीतील वावर नेहमी असतो. नुकतंच तिने छोट्या पडद्यावरील ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका उत्तमरित्या पार पाडताना दिसली होती. क्रांतीने शासकीय अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी विवाह केला आहे. झिया व झायदा अशी त्यांच्या जुळ्या मुलींची नावे. पण त्यांचे आई-बाबा त्यांना ‘गोदू’ आणि ‘छबील’ अशी प्रेमळ हाक मारतात. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या क्रांतीने तिच्या मुलीचा एक सुंदर व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जो सध्या व्हायरल होत आहे. (Kranti Redkar share a Husband and Daughter Video)
क्रांती नेहमीच तिच्या जुळ्या मुलींचे अनेक गोड व अतरंगी क्षण तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. चाहत्यांनादेखील तिच्या मुलींचे व्हिडीओ बरेच आवडताना दिसतात. अशातच तिने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये क्रांतीचे पती समीर वानखेडे त्यांच्या लेकीचा अभ्यास घेताना दिसत आहे, जे पाहून क्रांती भारावून गेली होती. हा व्हिडीओ शेअर करताना क्रांती म्हणाली, “जर ते तुमच्या मुलांचा अभ्यास घेण्यास मदत करत असतील, तर विश्वास ठेवा तुम्ही नशीबवान आहात. हे सर्व सह-पालकत्व आणि एकमेकांचा भार कमी करण्याबद्दल आहे.”. हे म्हणताना तिने पती समीर वानखेडे यांचे आभार मानले आहे.
हे देखील वाचा – २१ वर्षांपूर्वी असे दिसायचे वैभव मांगले, सोशल मीडियावर शेअर केला जुना फोटो, नेटकरी म्हणाले, “गेलेले केस…”
सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत “खूपच छान आहे. बाबांसोबत अभ्यास करतेय ती गोदो आहे की छबील?” असा प्रश्न तिला विचारला. यावर क्रांतीने ते छबीलचा अभ्यास घेत असल्याचे सांगितले. तर दुसरा एक नेटकरी म्हणाला, “एकच बाबांबरोबर बसली आहे, मग गोदो का मोबाईल घेऊन बसली?”. आणखी एका नेटकऱ्याने यावर कमेंट केली की, “बाबा जेव्हा मुलीचा अभ्यास घेतात ना, तेव्हाच आईला रील बनवता येतं.” समीर व त्यांच्या लेकीचा हा व्हिडीओ चाहत्यांना आवडला आहे.
हे देखील वाचा – “टॉयलेटही नाही, मासिक पाळी आली तर…”, नाट्यगृहांच्या अवस्थेबाबत निवेदिता सराफ यांचा संताप, म्हणाल्या, “तेव्हा मी आवाज चढवला कारण…
अभिनयाबरोबरच क्रांतीची निर्माती, दिग्दर्शिका, नृत्यांगना, सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटर म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. क्रांतीने काही वर्षांपूर्वी ‘काकण’ चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. आता ती ‘रेनबो’ या चित्रपटातून पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.