बॉलिवूडमधील सतत चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. अनेक यशस्वी चित्रपट देऊन तिने आता राजकारणात प्रवेश केला आहे. भाजपकडून हिमाचल प्रदेशमध्ये मंडीतील लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. तिच्या राजकारणातील प्रवेशामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनंतर सर्वच स्तरामध्ये विविध चर्चाना उधाण आले आहे. अशातच आता कंगनाबद्दल एक जुना वाद समोर आला आहे. काही काळापूर्वी कॉँग्रेस नेते सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनाबद्दल एक विधान केले होते जे खूप वादात सापडले होते. त्याला पलटवार म्हणून कंगनाने देखील एक विधान केले होते ज्यामध्ये तिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरबद्दल देखील विधान केले होते. हा व्हिडीओ आता समोर आला आहे. (kangana ranaut on urmila matondkar)
सदर व्हायरल झालेला व्हिडीओ हा २०२० सालचा आहे. यामध्ये कंगना नॅशनल टेलिव्हिजनवर बोलत आहे. यादरम्यान ती म्हणाली की, “मी उर्मिलाची एक अपमानास्पद मुलाखत पाहिली. ज्याप्रमाणे ती माझ्याबद्दल बोलत आहे, माझी मस्करी करत आहे, माझ्या संघर्षाची मस्करी करत आहे जसे की मी भाजपला खुश करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे”.
तसेच पुढे ती म्हणाली की, “हे सर्व समजण्यासाठी हुशार असण्याची गरज नाही. तिकीट मिळवणे माझ्यासाठी कठीण नाही. उर्मिला एक सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. ती तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही. ती नक्की कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी योग्य आहे. जर तिला तिकीट मिळू शकतं तर मला का नाही ?” उर्मिलावर केलेल्या विधानामुळे कंगनावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटत होत्या.
अशातच आता कंगनाला तिकीट मिळाल्यानंतर आता सुप्रिया श्रीनेत यांनी आपल्या सोशल मीडियावरुन अभिनेत्रीचा एक फोटो शेअर करत “मंडीमध्ये सध्या काय भाव सुरु आहे ?” असे कॅप्शन लिहिले आहे. त्यावर प्रतिक्रिया देत कंगनाने उत्तर दिले की, “एक अभिनेत्री म्हणून गेल्या २० वर्षात मी विविध भूमिका केल्या आहेत”.
पुढे ती म्हणाली की, क्वीनमध्ये एका साध्या मुलीपासून धाकडमधील जासुस, मणिकर्णिकामध्ये देवीपासून चंद्रमुखीमधील एक राक्षस, रज्जोमधील वेश्यापासून ‘थलायवी’मधील एक क्रांतिकारी नेत्यांपर्यंत सर्व भूमिका केल्या आहेत. मुलींना एका पठडीत बांधणं बंद करायला हवं. तसेच महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आव्हानाला सामोरी जाणाऱ्या वेश्या या शब्दाचा वापर करताना अपमानास्पद बोलू नये. प्रत्येक महिलेला सन्मान मिळाला पाहिजे”.
कंगनाच्या राजकारणातील प्रवेशामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा खूप काळापासून सुरु होत्या.