domestic violence news : सर्वसामान्यांप्रमाणे अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या घरातच कुटुंबाकडून अत्याचार सहन करावा लागला आहे. बऱ्याच अभिनेत्रींनी याबाबत आवाज उठविला आहे तर काहींनी सगळं सहन करत शांत राहण्याचं ठरवलं आहे. अशातच एका अभिनेत्रीने एक्स बॉयफ्रेंडफर अत्याचार केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. एक्स बॉयफ्रेंडने अभिनेत्रीला मारहाण केली, अनेक वार केले असे अनेक आरोप केले. याबाबत आता अभिनेत्रीने थेट सोशल मीडियावर भाष्य केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे जसीला परवीन. जसीला परवीनने सोशल मीडिया स्टोरी पोस्ट करत बॉयफ्रेंडकडून झालेल्या छळाबाबत भाष्य केलं. या घटनेबाबत चाहत्यांकडून विचारणा होताच तिने अनेक खुलासे केले आहेत.
अभिनेत्रीने मारहाणीचे फोटो शेअर करताच ही घटना केव्हा घडली अशी चाहत्यांकडून विचारणा झाली. यावर अभिनेत्रीने लिहिलं, “३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या पार्टीनंतर माझा व डॉन थॉमसचा वाद झाला. त्यानंतर त्याने माझ्या पोटात दोनदा लाथ मारली, माझ्या चेहऱ्यावर त्याने मारले, त्यामुळे आता मला प्लास्टिक सर्जरी करावी लागणार आहे”.

पुढे तिने म्हटलं की, “सुरुवातीला तो मला रुग्णालयात नेण्यास नकार देत होता, पण नंतर मला खोट बोलावं लागलं, तेव्हा त्याने मला रुग्णालयात नेले. रुग्णालयात गेल्यानंतर तो खोटं बोलला. काही दिवसांनी मी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि याचा खटला अजूनही सुरुच आहे”. पोस्टमध्ये जसीलाने तिच्या मानसिक आरोग्याबद्दल भाष्य केलं. या कठीण काळात तिचे १० किलो वजन कमी झाले होते असा खुलासाही अभिनेत्रीने केला. “मला जेवता येत नव्हते, मी झोपू शकत नव्हते आणि आरशात स्वतःला ओळखूही शकत नव्हते”.
आणखी वाचा – प्रिया मराठेचे कॅन्सरमुळे निधन, भारतात महिला की पुरुष गटांत प्रमाण कर्करोगाचे प्रमाण अधिक, जाणून घ्या…
शेवटी तिने लिहिलं, “शस्त्रक्रिया केल्याने माझ्या चेहऱ्यावर टाके पडले, पण कोणी मला बोलण्यापासून रोखू शकले नाही. त्याला माझ्या आयुष्यात परत यायचं आहे, जणू काही काहीही झालंच नाही. मी त्याला शेवटची संधी देखील दिली होती. मी त्याला माफी माग असं सांगितलं, जेणेकरुन हे प्रकरण संपुष्टात येईल, पण प्रामाणिकपणा दाखवण्याऐवजी न्यायालयाचा पर्याय निवडला”, असं जसीला म्हणाली.


