शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सासरी कर्तव्य पार पाडतेय मुग्धा वैशंपायन, प्रथमेशसह मिळून मोदकही बनवले अन्…; साध्या राहणीमानाने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 6, 2025 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Mugdha Vaishampayan Ganeshotsav Special Video

सासरी कर्तव्य पार पाडतेय मुग्धा वैशंपायन, प्रथमेशसह मिळून मोदकही बनवले अन्…; साध्या राहणीमानाने वेधलं लक्ष

आज अनंतचतुर्दशीचा दिवस. गेले ११ दिवस गणरायाची भक्तिभावाने सेवा केली. भाविक गणरायाच्या स्वागतासाठी उत्सुक होतेच शिवाय आगमन झाल्यानंतर त्यांनी अगदी मनोभावे सेवाही केली. सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले होते. यांत असे अनेक कलाकार आहेत जे कोकणातील आहे. आणि त्यांच्या कोकणातील मूळ घरी गणपती बाप्पा आले होते. सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे हे सेलिब्रिटी कपलही कोकणात पोहोचले. प्रथमेश हा मूळचा कोकणातील म्हणजेच संगमेश्वर आरवलीचा आहे. आणि आरवलीतील घरी तो अधून मधून जात असतो.  (Mugdha Vaishampayan Ganeshotsav Special Video)

वेळोवेळी प्रथमेश व मुग्धा कोकणात गावच्या घरी जाताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लघाटे कार्यशाळेत गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी दोघेही आरवलीला पोहोचले होते. यावेळी लघाटेंचे संपूर्ण कुटुंब गणेशाची सेवा करताना दिसलं. संपूर्ण कुटुंब गणपतीच्या मूर्ती रंगवण्यात मग्न असलेलं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांच्या एकत्रितपणाचं, साधेपणाचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – “लालबागचा राजा गरीबांचा का फक्त VVIP चाच?”, दर्शनावेळी दुजाभाव करताच भाविक भडकले, थेट व्हिडीओ शेअर

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Umesh Laghate (@prathamesh_laghate_adhikrut)

यानंतर आता मुग्धा व प्रथमेशने शेअर केलेल्या फोटो, व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रथमेशने स्वतःच्या हाताने मोदक बनवले आहेत. तर मुग्धाही यांत काही कमी नाही. मुग्धानेही उत्तम आकार देत मोदक बनवले. “मोदक वळणं आणि बडबड करणं”, असं कॅप्शन देत तिने व्हिडीओ शेअर केला आहे. तर प्रथमेशनेही “यो मोदकसहस्रेण यजति॥ सालाबादप्रमाणे मोदक Making”, असं कॅप्शन देत व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Ashish Warang Death : ‘सिंबा’ फेम अभिनेते आशिष वारंग यांचे निधन, वयाच्या ५५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

मुग्धा व प्रथमेश नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. काही दिवसांपूर्वी दोघेही त्यांच्या गावी आरवलीला गणेशोत्सवासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी गणरायाची भक्तिभावे सेवा केली. गणरायाबरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो त्यांनी शेअर केले आहेत. समोर आलेल्या फोटोंवरुन मुग्धा लग्नानंतर तिच्या सासरी बऱ्यापैकी रंगलेली दिसली. मुग्धा व प्रथमेशच्या मोदक बनवतानाच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.

Tags: ganeshotsavmugdha vaishampayanprathamesh laghate
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Richest Bollywood Actress

बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण?, अनुष्का शर्मा - करीना कपूर पहिल्या पाच क्रमांकातून बाहेर, जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.