रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जान्हवी व खुशी कपूरमध्ये वाद, सोशल मीडियावर मागितली एकमेकांची माफी, कलाकारांनी दोघींचं सांत्वन केलं अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 14, 2024 | 12:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Janhvi Kapoor And Khushi Kapoor

जान्हवी व खुशी कपूरमध्ये वाद, सोशल मीडियावर मागितली एकमेकांची माफी, कलाकारांनी दोघींचं सांत्वन केलं अन्…

श्रीदेवी व बोनी कपूर यांची लेक अभिनेत्री जान्हवी कपूर व खुशी कपूर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. बरेचदा अनेक कार्यक्रमांमध्ये दोघेही एकत्र स्पॉट होताना सिस्ल्या आहेत. दोन्ही बहिणींमधील खास बॉण्डिंग नेहमीच पाहायला मिळालं आहे. पण सध्या दोघींमध्ये भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यासाठी एकाने माफी मागितली तर दुसऱ्याने माफही केले आहे. इंस्टाग्रामवर झालेल्या दोघींमधील संवादातून हे समोर आलं आहे. (Janhvi Kapoor And Khushi Kapoor)

खरंतर, इंस्टाग्रामवर खुशी कपूरने मेकअप चेअरवर बसून मिरर सेल्फी पोस्ट केली आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिने राखाडी रंगाचा हाय-नेक स्वेटशर्ट घातला होता. याच पोस्टवर जान्हवी कपूरने त्यांच्या भांडणानंतर माफी मागितली. तिने लिहिले, “मला तुझी आठवण येत आहे. मला माफ कर. मी तुझ्याशी भांडले. मी तुझ्यावर खूप प्रेम करते”, असं म्हणत तिने एक हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे. याचबरोबर अभिनेत्रीने “तू सर्वोत्कृष्ट आहेस, माय डिअर”, असेही लिहिले आहे.

आणखी वाचा – “आपलंच जग…”, ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त कुशल बद्रिकेची बायकोसाठी खास पोस्ट, एकत्र फोटो शेअर करत म्हणाला, “जगाशी संबंध…”

View this post on Instagram

A post shared by ᴋʜᴜsʜɪ ᴋᴀᴘᴏᴏʀ (@khushi05k)

जान्हवी कपूरच्या या कमेंटवर धाकटी बहीण खुशी कपूरने प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळाली आहे. खुशीने लिहिले आहे की, “तुझीही आठवण येत आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मलाही माफ कर. हाहाहाहाहा”, असं म्हटलं आहे. दोघींच्या या पोस्टवर आता त्याच्या कुटुंबीयांनी व चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. शनाया कपूरने लिहिले आहे की, “मिस यू”, तर ऑरीने, “ग्लॅमर गर्ल” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – दलजित कौर व निखिल पटेल यांच्या घटस्फोटाच्या अफवा खऱ्या ठरल्या?, अभिनेत्रीच्या नवऱ्याच्या ‘त्या’ कृतीने चर्चांना उधाण

जान्हवी कपूर व खुशी कपूर यांच्या नात्याबद्दल बोलायचे झालं तर, आईच्या मृत्यूनंतर त्यांनी एकमेकांची चांगली काळजी घेतली. ‘कॉफी विथ करण’मध्ये जान्हवीने बहिणीबरोबरच्या खास बॉण्डिंगबाबत सांगितल. खुशी एकदा रडत होती. तेव्हा मी तिचा खोलीत गेल्यावर तिची बहीण रडायची थांबली. ती लगेच आली आणि जान्हवीजवळ बसली आणि तिचे सांत्वन करु लागली. यानंतर खुशी पुन्हा कधीही रडताना दिसली नाही.

Tags: bollywood actressentertainmentjanhvi kapoorJanhvi Kapoor And Khushi Kapoorkapoor familyKhushi Kapoor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Kiran Rao talk about her bond and relationship with Aamir Khan see the details

ना वाद, ना मतभेद, तरीही घटस्फोट अन्...; आमिर खानबरोबरच्या नात्यावर किरण रावचं भाष्य, म्हणाली, “एक कुटुंब म्हणून...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.