श्रीदेवी व बोनी कपूर यांची लेक अभिनेत्री जान्हवी कपूर व खुशी कपूर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. बरेचदा अनेक कार्यक्रमांमध्ये दोघेही एकत्र स्पॉट होताना सिस्ल्या आहेत. दोन्ही बहिणींमधील खास बॉण्डिंग नेहमीच पाहायला मिळालं आहे. पण सध्या दोघींमध्ये भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यासाठी एकाने माफी मागितली तर दुसऱ्याने माफही केले आहे. इंस्टाग्रामवर झालेल्या दोघींमधील संवादातून हे समोर आलं आहे. (Janhvi Kapoor And Khushi Kapoor)
खरंतर, इंस्टाग्रामवर खुशी कपूरने मेकअप चेअरवर बसून मिरर सेल्फी पोस्ट केली आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिने राखाडी रंगाचा हाय-नेक स्वेटशर्ट घातला होता. याच पोस्टवर जान्हवी कपूरने त्यांच्या भांडणानंतर माफी मागितली. तिने लिहिले, “मला तुझी आठवण येत आहे. मला माफ कर. मी तुझ्याशी भांडले. मी तुझ्यावर खूप प्रेम करते”, असं म्हणत तिने एक हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे. याचबरोबर अभिनेत्रीने “तू सर्वोत्कृष्ट आहेस, माय डिअर”, असेही लिहिले आहे.
जान्हवी कपूरच्या या कमेंटवर धाकटी बहीण खुशी कपूरने प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळाली आहे. खुशीने लिहिले आहे की, “तुझीही आठवण येत आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मलाही माफ कर. हाहाहाहाहा”, असं म्हटलं आहे. दोघींच्या या पोस्टवर आता त्याच्या कुटुंबीयांनी व चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. शनाया कपूरने लिहिले आहे की, “मिस यू”, तर ऑरीने, “ग्लॅमर गर्ल” असं म्हटलं आहे.

जान्हवी कपूर व खुशी कपूर यांच्या नात्याबद्दल बोलायचे झालं तर, आईच्या मृत्यूनंतर त्यांनी एकमेकांची चांगली काळजी घेतली. ‘कॉफी विथ करण’मध्ये जान्हवीने बहिणीबरोबरच्या खास बॉण्डिंगबाबत सांगितल. खुशी एकदा रडत होती. तेव्हा मी तिचा खोलीत गेल्यावर तिची बहीण रडायची थांबली. ती लगेच आली आणि जान्हवीजवळ बसली आणि तिचे सांत्वन करु लागली. यानंतर खुशी पुन्हा कधीही रडताना दिसली नाही.