शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पण चाय से ज्यादा किटली गरम कारण…”, युवराज सिंगबरोबर काम केल्यानंतर हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली, “तो सेटवर येताना प्रचंड…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 21, 2023 | 1:25 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Hemangi Kavi New Ad

"पण चाय से ज्यादा किटली गरम कारण...", युवराज सिंगबरोबर काम केल्यानंतर हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली, "तो सेटवर येताना प्रचंड..."

रंगभूमी, छोटा पडदा यांसारख्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे हेमांगी कवी. अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये निवडक पण लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या हेमांगीने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. शिवाय, नृत्य व विनोदी कार्यक्रमांमध्येही हेमांगीने आपल्या कलेची झलक दाखवली आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेचे प्रेक्षकांकडून नेहमीच कौतुक होत असून तिने अनेक जाहिरातींमध्ये कामदेखील केलं आहे. अशातच तिने नुकताच एका जाहिरातीचं शूटिंग पूर्ण केलं असून या जाहिरातीत ती एका प्रसिद्ध क्रिकेटपटूबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. (Hemangi Kavi Ad Shoot)

अभिनेत्री हेमांगी कवी लवकरच एका जाहिरातीत दिसणार असून त्या जाहिरातीचं शूटिंग तिने नुकतंच पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे, या जाहिरातीत ती प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंहबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हेमांगीने सोशल मीडियावर या शूटची छोटीशी झलक तिच्या चाहत्यांसह शेअर केली आहे.

हेमांगीने तिच्या फेसबुक अकाउंटवर या शूटचे काही फोटोज शेअर केले आहे. हे फोटोज शेअर करत हेमांगी यात म्हणते, “शूटिंग सेटवर येताना प्रचंड सुरक्षा व्यवस्था, संपूर्ण लवाजम्यासह त्याचे आगमन! ते असणारच कारण एकतर आऊटडोअर शूट अन् त्याचे क्रेझी क्रिकेट फॅन्स! चहापेक्षा किटली गरम म्हणतात ना तसलं काही. त्याच्यापेक्षा आजूबाजूच्या मंडळींचीच गडबड अधिक.”

हे देखील वाचा – गणरायाच्या दर्शनासाठी अर्पिता खानच्या घरी पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सलमान खानसह काढले फोटो, सोशल मीडियावर रंगतेय चर्चा

“तो इतका शांत स्वभावाचा माणूस आहे. जसा तो आला, त्याने काय डायलॉग्स बोलले. सगळ्यात एक ठासून भरलेला पंजाबी swag! माझा संवाद सुरु झाल्यावर चकित होऊन तो माझं कौतुक करत होता. तो अभिनेता नसला, तरी पद्मश्री, अर्जुन पुरस्कार मिळवलेला, दोन वेळा आपल्या देशाला विश्वचषक जिंकून देणारा हा अतिशय उत्तम क्रिकेटपटू आहे. सेलिब्रिटी असूनसुद्धा त्याने कुठलाही लवलेश न दाखवता हसत खेळत जाहिरातीचं शूट केलं. ब्रेकमध्ये मी त्याला फोटोसाठी विचारले असता, त्याने त्याच्या व्हॅनिटीमध्ये स्वागत करत माझे कौतुक केले. “अरे क्या कमाल करते हो आप, आपको और तरक्की मिले, आप स्टार बन जाओ ये दिल से दुआं देता हॅूं” असं म्हणत त्याने एक फोटो दिला. तो विनम्र असून मला त्याच्याबरोबर काम करताना मजा आली.”, असं हेमांगी या पोस्टमध्ये म्हणाली. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह कलाकारांनी कमेंटद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हे देखील वाचा – गुलाबी सुट, हातावर मेहंदी…; परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, फोटो व्हायरल

हेमांगी नुकतीच रवि जाधव यांच्या ‘ताली’ वेबसीरिजमध्ये दिसली होती, ज्यात तिने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक झाले होते. अभिनयाबरोबर आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाणारी हेमांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सामाजिक मुद्दा असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग, ती याबद्दल सोशल मीडियावर आपले रोखठोक मत मांडताना दिसते. यासह ती अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Tags: Ad shootinghemangi kaviHemangi Kavi New Ad
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Akhil Mishra Death

‘थ्री इडियट्स’ फेम अभिनेत्याचा स्वयंपाकघरामध्ये पडून धक्कादायक मृत्यू, पत्नीची अवस्थाही बिकट, म्हणाली, “जोडीदारच गेला अन्...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.