शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या १२ वर्षांनंतर हेमा मालिनीच्या लेकीचा घटस्फोट, दोन मुलंही आहेत आणि…; नवऱ्यापासून वेगळं होताच म्हणाली, “आमच्या आयुष्यातील…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 6, 2024 | 6:28 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Actress Esha Deol has separated from her husband Bharat Takhtani see the details

लग्नाच्या १२ वर्षांनंतर हेमा मालिनीच्या लेकीचा घटस्फोट, दोन मुलंही आहेत आणि...; नवऱ्यापासून वेगळं होताच म्हणाली, "आमच्या आयुष्यातील..."

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र व ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी तिच्या अभिनय कारकिर्दीपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली आहे. अलीकडेच ईशा देओलबाबत समोर आलेल्या एका बातमीने सर्वांनाचं आश्चर्य वाटले आहे. गेले काही दिवस अभिनेत्री पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळाल्या होत्या. अशातच आता दोघांनी त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं अधिकृतपणे सांगितलं आहे. 

ईशा देओल व भरत तख्तानी लग्नाच्या १२ वर्षानंतर वेगळे होत आहेत. दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा हा निर्णय घेतला आहे. दोघांनी मिळून एक प्रतिक्रिया दिली आहे, ज्यात त्यांनी असं म्हटले आहे की, “आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनातील या बदलामुळे आमच्या दोन मुलांचे हित आणि कल्याण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि यापुढेही ते कायम राहील. यादरम्यान आमच्या गोपनीयतेचा आदर केला जाईल अशी आशा बाळगतो.”

View this post on Instagram

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

आणखी वाचा – आधी गर्भपात, मुल नको होतं अन्…; ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा गरोदर, म्हणाली, “तीन महिन्यांमध्येच…”

ईशा देओलच्या यंदाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये भरत हा कुठेच दिसला नाही. याशिवाय एका सोशल मीडिया यूजरने १७ जानेवारीला Reddit वर एक पोस्ट शेअर केली आणि त्यात असे सांगितले होते की, “ईशा आणि भरत आधीच एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. त्यामुळे ते आता सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसत नाहीत.”

आणखी वाचा – Video : भर कार्यक्रमात बायकोने ‘अहो’ म्हणताच रितेश देशमुखने मारल्या शिट्ट्या, देशमुखांच्या सूनेचं मराठी ऐकून कौतुकाचा वर्षाव

दरम्यान, ईशा देओलने जून २०१२ मध्ये भरतशी लग्न केले होते. मुंबईच्या इस्कॉन मंदिरात अत्यंत साधेपणाने त्यांचा विवाह पार पडला होता. लग्नाच्या पाच वर्षानंतर, हे जोडपे एका मुलीचे आई-वडील झाले आणि त्यानंतर २०१९ मध्ये ईशाने त्यांची दुसरी मुलगी मिराया तख्तानीला जन्म दिला.

Tags: भरत तख्तानीमनोरंजन बातमीईशा देओलईशा देओल घटस्फोट बातमीईशा देओल भरत तख्तानी विभक्तबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीBharat Takhtanibollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsEsha deolEsha Deol Bharat Takhtani SeparationEsha Deol Divorce News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
mugdha vaishampayan story

Video : स्वतः गाडी चालवत माहेरी पोहोचली मुग्धा वैशंपायन, घरी जेवताना आली नवऱ्याची आठवण, म्हणाली, "तुझी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.