अभिनेत्री अंकिता लोखंडे व व्यावसायिक विकी जैन हे आपल्या कौटुंबिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. अंकिता व विकी नुकतेच टेलिव्हीजनवरील प्रसिद्ध शो ‘बिग बॉस सीझन १७’मध्ये दिसले होते. यामध्ये अंकिता व विकीमध्ये भांडणं, रुसवे-फुगवे दिसून आले होते. तसेच या शोमध्ये विकीची आई रंजना जैन यांनीदेखील हजेरी लावली. त्यावेळी रंजना अंकिताच्या विरोधात बोलून चर्चेत आल्या होत्या. रंजना यांनी केलेल्या विधानांमुळे त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. विकीची आई व अंकिताच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाल्याने अंकिता व विकी घटस्फोट घेऊ शकतात अशा चर्चाही रंगल्या होत्या. पण या शक्यतांना अंकिता व विकीने नाकारले आणि सर्व सुरळीत असल्याचं जाहीर केले. आता पुन्हा एकदा अंकिताचे सासू-सासरे हे दोघेही व्हायरल झालेल्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. (Ankita lokhande mother-In-law maharani look)
विकीचा मोठा भाऊ व रेशु जैनचे पती विशाल जैन यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताचे सासू-सासरे तीर्थंकार भगवान यांचे आई-वडील वामदेवी व अश्वसेन यांच्या रुपात दिसत आहेत. विकीचे आई-वडील एका वेगळ्याच पोशाखामध्ये समोर आले आहेत. विकीची आई रंजना या महाराणीच्या पोशाखात असून वडिलांनी शेरवानी परिधान केली आहे. या पोस्टमध्ये रंजना यांनी भरजरी लेहंगा परिधान केला असून हिऱ्या मोत्याचे दागिने घातले आहेत.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये एक महिला रंजना यांच्या पायाशी बसलेली दिसत आहे. तसेच एक लहान मुलगी रंजना यांच्या मांडीवर बसून फोटो काढत आहे. जैन धर्मामध्ये मंदिर स्थापनेवेळी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये विकीच्या आई वडिलांनी सहभाग घेतला होता.
इन्स्टाग्रामवर अंकिताच्या सासू-सासऱ्यांचे महाराज व महाराणीच्या पोशाखातील व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडीओला अंकिता व विकीच्या चाहत्यांनी पसंती दिली असून काहींनी ट्रोलदेखील केले आहे. एक नेटकरी म्हणतो की, ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ अंकितापेक्षा तर ही नाटकी आहे’, दुसरा नेटकरी लिहितो की, ‘पुढील राधे माँ’, तसेच एकाने ‘मदर इंडिया’ लिहून हसण्याची इमोजी टाकली आहे.