यूपीच्या सुलतानपूर येथील स्थानिक गायिका व अभिनेत्री मल्लिका राजपूतने आत्महत्या केली आहे. विजय लक्ष्मी उर्फ मल्लिका राजपूत या विवाहित महिलेचा कोतवाली नगरच्या सीताकुंड परिसरात संशयास्पद मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी मल्लिकाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आई सुमित्रा सिंह यांच्या म्हणण्यानुसार, मुलगी मुंबईत राहत होती. ती एक युट्युबर देखील होती. चार-पाच वर्षांपूर्वी मुंबईतच प्रदीप शिंदे जनार्दनसह तिचा विवाह झाला होता. प्रथमदर्शनी, वैवाहिक जीवनात थोडे मतभेद असलेलं प्रकरण आहे. (Mallika Rajput Death)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मल्लिकाने तिच्या सुलतानपूरच्या घरात आत्महत्या केली. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त असून अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. विशेष म्हणजे मल्लिका तिच्या ‘रिव्हॉल्वर रानी’ या चित्रपटात कंगना राणौतसह सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली होती.
मल्लिका राजपूतने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतबरोबर काम केले. गायक शानच्या ‘यारा तुझे’ या म्युझिक अल्बममधूनही मल्लिकाला नाव व प्रसिद्धी मिळाली. याशिवाय मल्लिकाने अनेक मालिका, अल्बममधूनही लोकप्रियता मिळवली होती. मल्लिका राजपूत राजकारणातही कार्यरत होती. तिने भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, २०१८ मध्ये एका बलात्कारी व्यक्तीला पाठिंबा दिल्याचा आरोप झाल्यानंतर तिने पक्षाचा निरोप घेतला. मनोरंजन विश्वात व नंतरच्या काळात राजकारणात मल्लिका यशस्वी कारकीर्द करु शकली नाही, त्यांनतर मल्लिका अध्यात्माकडे वळली. तिने कपाली महारद यांच्याकडून गृहस्थान संन्यासाची दीक्षा घेतली.
आणखी वाचा – गरोदरपणाच्या चर्चांवर अखेर माहिरा खानने सोडलं मौन, स्वतःच खुलासा करत म्हणाली, “हे खरं…”
मल्लिकाच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीचा कुटुंबियांबरोबर काही कारणावरुन वाद झाला होता. याप्रकरणी पोलिसांनाकडेही तक्रार करण्यात आली हाती. त्यावेळी पोलिसांनी हे प्रकरण सांभाळून मिटवले. मात्र त्यानंतर मल्लिकाने रात्री आत्महत्या का केली, हा प्रश्न साऱ्यांना सतावत आहे. मल्लिकाच्या मृत्यूचा सध्या तपास सुरु असल्याचं समोर आलं आहे.