Aishwarya Narkar And Avinash Narkar New Home : मालिकाविश्वातील लोकप्रिय आणि कायमच चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर. हे नारकर कपल नेहमीच चर्चेत असलेलं पाहायला मिळालं आहे. नाटक, मालिका, चित्रपट यांसारख्या तीनही माध्यमातून ऐश्वर्या व अविनाश यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. कलाकार म्हणून गेला अनेक काळ ही जोडी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. त्यांच्या कामाबरोबरच ही जोडी सोशल मीडियावर देखील विशेष चर्चेत असते. त्यांचे ट्रेंडिंग गाण्यावरचे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. आजही त्यांचा तो उत्साह काळानुसार पुढे जाण्याची वृत्ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते.
ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांच्या फिटनेसची देखील सर्वत्र चर्चा असते. फिटनेसबाबतचे ही अनेक अपडेट त्या वेळोवेळी देत असतात. अशातच या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीने नुकतीच आपल्या चाहत्यांना नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी दिली आहे. नव्या घरातून दिसणाऱ्या सुंदर अशा दृश्याचा व्हिडीओ शेअर करत, “आनंदाचा नवीन रस्ता. आमचं नवीन घर”, असं कॅप्शन देत त्यांनी नव्या घराबाबत अपडेट दिली होती. यानंतर आता ऐश्वर्या यांनी नवं घर घेतल्याची अधिकृत पोस्ट शेअर केली आहे.
ऐश्वर्या यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये हे नवं घर ऐश्वर्या यांनी नाही तर त्यांच्या पतीने म्हणजेच अविनाश यांनी घेतलं असल्याचं समोर आलं आहे. “घर. अविच्या नावावरचं पहिलं घर. सतत दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा विचार. राहत्या घरावर पण माझंच नाव. अगदी घरातल्या ताट – वाटिवरसुध्दा. आज खूप छान वाटतंय. तुझी न बाळगलेली सर्व स्वप्न पूर्ण होवोत”, असं कॅप्शन देत ऐश्वर्या यांनी हा सुंदर असा नव्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – सलमान खानकडून ५ कोटींची खंडणी मागणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात, जमशेदपूरमधून भाजी विक्रेत्याला अटक
ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे. उत्कृष्ट फर्निचर असलेल्या या घराच्या नेमप्लेटवर अविनाश व ऐश्वर्या दोघांचीही नाव पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.