मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्वतःच स्थान निर्माण केलं. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करण्यासोबतच तिने सूत्रसंचालनाची उत्तम जबाबदारीही पेलवली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं ती उत्तम पद्धतीने सूत्रसंचालन करताना दिसून येतेय. प्राजक्ताला हास्यजत्रेच्या मंचावर पाहायलाही चाहते उत्सुक असतात. अभिनयासोबतच तिने एक व्यावसायिक म्हणून पाऊल उचललं आहे. आणि अवघ्या काही दिवसांतच तिला उत्तम यश देखील मिळालेलं पाहायला मिळालं. प्राजक्ताने ‘प्राजक्तराज’ नावाने स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरु केला आहे. अशातच प्राजक्ताने सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत साऱ्यांना गुडन्यूज दिली आहे. (Prajakta Mali Farmhouse)
प्राजक्ताने स्वतःच असं एक निसर्गाच्या कुशीत आलिशान फार्महाऊस तयार केलं आहे. या फार्महाऊसला प्राजक्ताने ‘प्राजक्तकुंज’ असं नाव दिल आहे. नुकताच प्राजक्ताचा वाढदिवस झाला असून तिने तिचा यंदाचा वाढदिवस कुटुंबासोबत फार्महाऊसवर साजरा केला असल्याचं समोर आलं आहे.
पाहा हास्यजत्रेतील कलाकारांची प्राजक्ताच्या फार्महाऊसवर धमाल (Prajakta Mali Farmhouse)
यानंतर आता प्राजक्ताच्या फार्महाऊसवर हास्यजत्रेतील मंडळी पोहोचले आहेत. प्रेक्षकांचा लाडका दादूस अभिनेते अरुण कदम यांनी सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फार्महाऊसवरील काही फोटो शेअर केले आहेत, या फोटोंवरून असं कळतंय की, हास्यजत्रेतील मंडळी प्राजक्ताच्या फार्महाऊसवर पोहोचली आहेत.
फार्महाऊस बाहेरील निसर्गाचा आनंद लुटतानाचे काही फोटो अरुण कदम यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. तसेच हास्यजत्रेतील कलाकार विराज जगतापने ही सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत फार्महाऊसवर केलेली धमाल शेअर केली आहे. दरम्यान हास्यजत्रेतील सर्व कलाकारांनी मिळून प्राजक्ताचा वाढदिवसही साजरा केला आहे.
हास्यजत्रेच्या कलाकारांसोबत प्राजक्ताचं बॉण्डिंग उत्तम असल्याचं आपण नेहमीच पाहतो. ती नेहमीच सगळ्यांच्या संपर्कात राहते. प्राजक्ताच्या ‘वाह दादा वाह’ या वाक्याचे लाखो दिवाने चाहते आहेत. बराच काळ ब्रेक घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा हास्यजत्रा नव्या जोमाने प्रेक्षकांच्या मनावर मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहे.