शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी अभिनेत्याचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 24, 2025 | 2:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
marathi Actor Tushar Ghadigaonkar suicide

मराठी अभिनेत्याचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

marathi Actor Tushar Ghadigaonkar suicide : काम मिळत नसल्याने आत्महत्या हा काही पर्याय नाही. हो. असं बोलण्यामागचं कारण म्हणजे नुकतीच मराठी सिनेविश्वातून आलेली दुःखद बातमी. अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक तुषार घाडीगांवकरचे निधन झाले असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यादरम्यान, तुषारने आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. तुषारच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे. तुषारच्या आत्महत्येची बातमी समोर येताच चाहत्यांना आणि कलाकारांनाही धक्का बसला. तुषारच्या निधनाची बातमी अभिनेता अंकुर वाढवेने इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली.

‘आत्महत्या हा पर्याय नाही’, असं म्हणत अंकुरने तुषारचा मालिकेतील सीनदरम्यानचा फोटो शेअर करत निधनाची बातमी दिली आहे. तुषारच्या या निर्णयाने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. आजवर त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली. मात्र, त्याने आत्महत्येसारखा चुकीचा निर्णय का घेतला हा प्रश्न आजही सतावत आहे. मूळचा कणकवलीचा असलेल्या तुषारने नाटकांमधून अभिनयाची सुरुवात केली.

आणखी वाचा – मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा अडकला लग्नबंधनात, बालपणीच्या मैत्रिणीसह थाटला संसार, फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by Ankur Vitthalrao Wadhave (@ankur_vitthalrao_wadhave)

अंकुरने तुषारच्या निधनाची पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “मित्रा का? कशासाठी? आपण मार्ग काढले पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही. मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय असू शकत नाही. तुषार घाडीगांवकर तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो”. अंकुरची ही भावुक पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली असून अनेक कलाकार आणि चाहतेही त्याच्या या पोस्टवर कमेंट करत भावुक झालेले दिसत आहेत.

आणखी वाचा – काजोलचा देवावरील विश्वासच उडाला, ‘तो’ काळ अभिनेत्रीसाठी खूपच कठीण, म्हणाली, “हे सोपे नव्हते”

तुषारच्या निधनाच्या बातमीवर सिनेविश्वातील कलाकार मंडळी त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, उनाड, हे मन बावरे, भाऊबळी या कलाकृतींमधून तुषारने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नाटकांमधून अभिनयाची सुरुवात करणारा तुषार कालांतराने मालिका आणि नाटकविश्वातही रमला.

Tags: emotional postmarathi actorTushar Ghadigaonkar suicide
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Filmmaker Died In Ahmedabad Plane Crash

अहमदाबाद विमान अपघातात चित्रपट निर्माते महेश जिरावलाचा मृत्यू, DNA टेस्टद्वारे पटली ओळख, कुटुंबीय हादरले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.