अभिनेता श्रेयस तळपदे हे नाव माहित नसेल असे फार कमी लोक असतील.इकबाल या चित्रपटातून श्रेयसने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले.बॉलीवूड मध्ये श्रेयसने अनेक चित्रपट केले आहेत. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये श्रेयस महत्वाच्या भूमिकांमध्ये पाहायला मिळालं.श्रेयसच नाव घेतल्यावर गोलमाल,इकबाल गोलमाल रिटर्न्स,हाऊसफुल २, ओम शांती ओम या आणि अशा अनेक चित्रपटांची आवर्जून आठवण होते.मराठी मुलाने बॉलीवूड मध्ये मिळवलेल्या यशामुळे कायमच श्रेयसचं कौतुक होताना पाहायला मिळतं.(Shreyas Talpade struggle Day)
हिंदीप्रमाणे मराठी सिनेसृष्टीमध्ये ही श्रेयसने त्याच्या कामाची छाप पाडली आहे.सावरखेड एक गाव,पछाडलेला ,आई शपथ, आपडी थापडी, पोश्टर बॉईज असे अनेक मराठी चित्रपट श्रेयसने केले आहेत.अनेक वर्षानंतर पोस्टर बॉईज २ हा चित्रपट घेऊन श्रेयस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच पोस्टर बॉईज २ या चित्रपटाचं पोस्टर अनावरण सोहळा पार पडला.हिंदी,मराठी चित्रपटांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवल्या नंतर अनेक वर्षांनी श्रेयसने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. या मालिकेला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.यश-नेहाच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.
पाहा काय आहे श्रेयसची स्ट्रगल स्टोरी? Shreyas Talpade struggle Day
प्रेक्षक कलाकारांच्या कामाने त्यांना आपलंस करतात. परंतु सिनेसृष्टीमध्ये येणं आणि टिकून राहणं फार कठीण आहे.श्रेयसचा प्रवास देखील सोपा नव्हता.’खुपते तिथे गुप्ते’ या शो चा तिसरा सीजन सुरु आहे. या शो मधील पुढचा गेस्ट आहे श्रेयस आहे. श्रेयसच्या या एपिसोडचा प्रोर्मो समोर आला आहे.या प्रोमोमध्ये श्रेयस त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांबद्दल बोलताना पाहायला मिळाला.तसेच श्रेयसचा जवळचा मित्र अभिनेता जितेंद्र जोशी याला केलेल्या व्हिडिओ कॉल ची झलक दाखवण्यात आली.
त्यात जितेंद्र म्हणला,श्रेयस अनेक गोष्टी आहेत,मनामध्ये अनेक भावना आहेत.माझ्याकडे जेव्हा काम नव्हतं,तेव्हा तू मला काम मिळवण्यासाठी मदत केलीस.मला ठळकपणे आठवतंय की, तुझ्या आईने तुला स्पष्टपणे सांगितलं की, आता कुठेतरी नोकरी वैगरे बघ, नाटकामधून काही होत नाही.त्यानंतर आपण दोघे स्वामींच्या मठात गेलो. आणि त्या नंतर जे घडलं ते साऱ्या जगाने पाहिलं.हे ऐकून श्रेयसच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.ते ऐकून श्रेयसला अश्रू अनावर झाले.(Shreyas Talpade struggle Day)
हे देखील वाचा : कॅमेरामॅन ने ‘तू पनवती आहेस’ म्हणून हिणवलं तरीही आज मानानं घेतलं जात नाव!