Shashank Ketkar Shares Good News : अभिनेता शशांक केतकरने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याच्या सगळ्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ही गुडन्यूज म्हणजे अभिनेता लवकरच पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी प्रियांका ढवळे गरोदर असल्याचं सांगत हे जोडपं या नवीन वर्षात त्यांच्या बाळाचं स्वागत करणार असल्याचं समोर आलं होतं. यानंतर आता थेट व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने चाहत्यांसह आणखी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. शशांक केतकर आता बाबा झाला आहे. प्रियांका ढवळेने एका चिमुकलीला जन्म दिला आहे. थेट व्हिडीओ शेअर करत शशांक व प्रियांकाने आई-बाबा झाली असल्याची आनंदाची बातमी दिली आहे.
शशांकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आई-बाबांनी चिमुकलीचे छोटे छोटे हात हातात घेत व्हिडीओ काढला आहे. याशिवाय त्यांच्या लेकीच्या नामकरणाचाही फोटो समोर आला आहे. शशांक व प्रियांका त्यांच्या चिमुकलीचं नाव राधा असे ठेवले आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मुलगी झाली याचा आनंद शशांक व प्रियांका यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत आहे. “राधा”, असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
शशांकने वैयक्तिक आयुष्यात ४ डिसेंबर २०१७ मध्ये त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेबरोबर लग्न केलं. शशांक व प्रियांका यांनी २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं होतं. अभिनेत्याच्या मोठ्या मुलाचं नाव ऋग्वेद आहे. प्रियांका दुसऱ्यांदा गरोदर राहिली त्यानंतर ऋग्वेद, शशांक व प्रियांका या तिघांनी मिळून एकत्र मॅटर्निटी फोटोशूट केलं होतं.
आणखी वाचा – कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडू लागली कश्मिरा शाह, नवऱ्याने उचलण्याचा प्रयत्न केला पण…; Video Viral
दुसऱ्यांदा आई-बाबा होणार ही आनंदाची बातमी शेअर करत त्याने असं म्हटलं होतं की, “२०२५ चं स्वागत यापेक्षा छान बातमीनं होऊच शकत नाही. आम्ही पुन्हा एकदा आई-बाबा व्हायला, ऋग्वेद दादा व्हायला आणि आमचे आई बाबा पुन्हा एकदा आजी आजोबा व्हायला तयार झालो आहोत.” शशांक व प्रियांका आई-बाबा झाले असल्याचं समजताच मराठी कलाकारांनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.