Rakhi Sawant : राखी सावंत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. आजवर तिने अनेक चित्रपट, गाण्यांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिनयाबरोबरच राखी तिच्या मिश्किल स्वभावामुळे तसेच अनेक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ती ट्रोलदेखील होते. राखी सावंतला बॉलिवूडची ड्रामा क्वीन असे देखील म्हटले जाते. राखीला कोणीही गांभीर्याने घेत नाही पण करमणुकीच्या बाबतीत ती पारंगत आहे. अशातच पुन्हा एकदा राखी सावंत तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे, ज्यामध्ये ती पाकिस्तानला जाण्याबाबत बोलत आहे. हातात पासपोर्ट धरुन राखीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
राखी हातात पासपोर्ट धरुन असं म्हणताना दिसत आहे की, “मी पाकिस्तानला जात आहे”. अलीकडेच राखीने भारतातील ‘टिक टॉक’ बंदीबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि पंतप्रधान मोदींना टिक टॉक ऍप पुन्हा सक्रिय करण्याचे आवाहन केले होते. असे झाले नाही तर पाकिस्तानात जाऊन तिथल्या कोणाशी तरी लग्न करुन सेटल होईल, असेही राखीने म्हटले होते. आता राखीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिचा पासपोर्ट दाखवला आहे.
राखीने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, “मी पाकिस्तानला जात आहे”. राखीच्या या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या व्हिडीओखाली एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “एकतर तिथेच राहा किंवा यायचे ठरवले तर भारतीय पासपोर्ट सरेंडर कर आणि व्हिसा घेऊन इथे ये”. तर दुसऱ्या एकाने म्हटलं की, “सुरक्षित राहण्यासाठी फक्त एकेरी तिकीट खरेदी कर”. तर आणखी एकाने कमेंट करत म्हटलंय, “जा आणि परत येऊ नकोस”.
तर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय की, “पाकिस्तान, तू आयुष्यभर ठेव”. “रिटर्न तिकीट बुक करु नको”, असंही अनेकांनी म्हटलं आहे. अलीकडेच, जिओ टीव्हीशी झालेल्या संभाषणात राखीने हानिया आमिर तसेच पाकिस्तानी स्टार्स नर्गिस आणि दीदार यांना डान्स ऑफसाठी आव्हान दिले होते. यानंतर हानियाने एक व्हिडीओ शूट करून राखीला मजेशीर उत्तर दिले. या व्हिडीओमध्ये पार्श्वभूमीतून राखीचा आवाज येत आहे