मराठी कलाकार मंडळी ही नेहमीच त्यांच्या कामाव्यतिरिक्त सामाजिक बांधिलकीसाठीही ओळखले जातात. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी आपल्या क्षेत्राशिवाय समाजातील काही घटकांना मदतही करतात. मराठी कलाविश्वातील असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या जवळील माणसांच्या मदतीसाठी कायम धावून येतात. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेता शशांक केतकर. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेलेला शशांक सध्या ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अभिनेता अनेकदा सामाजिक व राजकीय विषयांवरही भाष्य करत असतो. (Shashank Ketkar appealing financial help)
अशातच त्याने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शशांकने आपल्या इन्स्टाग्रामवर एक मदतीचे आवाहन करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ‘मुरांबा’ मालिकेची सेटवरील मेकअपमॅनच्या पत्नीच्या कानाच्या उपचारांसाठीचा आहे. ‘मुरांबा’ मालिकेच्या सेटवर मेकअपमॅन म्हणून कार्यरत असणाऱ्या विशाल कांबळेच्या पत्नीला कानांच्या उपचारांसाठी पैशांची गरज आहे आणि ही गरज ओळखून शशांकने सर्व प्रेक्षकांना व चाहत्यांना मदत करण्याचे आवाहन केलं आहे. याचाच व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – 05 January Horoscope : मेष, सीन व कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात शनिवारी होणार सकारात्मक बदल, जाणून घ्या…
या व्हिडीओमध्ये शशांकने असं म्हटलं आहे की, “हा व्हिडीओ करण्यामागचं कारण असं आहे की, विशालच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी कानाचं इन्फेक्शन झालं होतं. ते इन्फेक्शन दोन्ही कानांना झालं. त्यावर ते उपचार घेत होत्या. त्याचा थोडा-अधिक खर्चही झाला. तेव्हा त्यांना थोडं थोडं ऐकूही येत होतं. पण दुर्दैवाने ते इन्फेक्शन तितकंस बरं झालं नाही आणि आता ते इन्फेक्शन वाढल्यामुळे त्यांना पूर्णत: ऐकू येत नाही. ओठांच्या हालचलींवरुन समोरचं माणूस काय म्हणतोय हे त्या ऐकत आहेत. मला खात्री आहे की, त्यांना यापुढे सुद्धा ऐकू येणार आहे. कारण त्यांना डॉक्टरांचा खूप छान सल्ला मिळत आहे. आम्हा सगळ्यांच्या सदिच्छा आहेत, त्यांना ही काही मदत लागेल तीसुद्धा आहेच. पण या उपचारासाठीचे जे पैसे लागणार आहेत ते खूप जास्त आहेत”.
आणखी वाचा – अखेर अक्षरा-अधिपतीची भेट होणार, पण भुवनेश्वरीचा काही वेगळाच प्लॅन, अडथळा येणार का?
यापुढे शशांकने असं म्हटलं आहे की, “पैसे एक रक्कमी देऊन उपचार करणे विशालसाठी अवघड आहे. म्हणून मदत म्हणून जास्त पैसे मिळण्याचे आवाहन करण्यासाठी आम्ही त्याच्याबरोबर आलो आहोत. याआधी त्याने दोन ते तीन लाख खर्च केला आहे आणि आता एकूण वीस लाख खर्च येणार आहे. इतकी मोठी रक्कम एक हाती असणं अवघड आहे. तर यांच्या पाठीशी आपण सगळे उभे राहुया. त्यामुळे त्याला शक्य तितकी मदत आपण करुयात. ज्यांना ज्यांना काही शंका असेल त्यांना विशाल सर्व काही माहिती देईल. तर आपण हा व्हिडीओ व्हायरल करुन त्याला शक्य तितकी मदत होण्यासाठी प्रयत्न करु”.