शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सेटवरील मेकअप मॅनसाठी धावून आला शशांक केतकर, व्हिडीओद्वारे सांगितली संपूर्ण व्यथा, मदतीचेही केलं आवाहन

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 5, 2025 | 9:44 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actor Shashank Ketkar shared a video appealing for financial help for the ear treatment of the makeup man's wife on the sets of Muramba

‘मुरांबा’ मालिकेच्या सेटवरील मेकअप मॅनच्या पत्नीच्या कानांच्या उपचारांसाठी शशांक केतकरचे आर्थिक मदतीचे आवाहन

मराठी कलाकार मंडळी ही नेहमीच त्यांच्या कामाव्यतिरिक्त सामाजिक बांधिलकीसाठीही ओळखले जातात. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी आपल्या क्षेत्राशिवाय समाजातील काही घटकांना मदतही करतात. मराठी कलाविश्वातील असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या जवळील माणसांच्या मदतीसाठी कायम धावून येतात. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेता शशांक केतकर. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेलेला शशांक सध्या ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अभिनेता अनेकदा सामाजिक व राजकीय विषयांवरही भाष्य करत असतो. (Shashank Ketkar appealing financial help)

अशातच त्याने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शशांकने आपल्या इन्स्टाग्रामवर एक मदतीचे आवाहन करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ‘मुरांबा’ मालिकेची सेटवरील मेकअपमॅनच्या पत्नीच्या कानाच्या उपचारांसाठीचा आहे. ‘मुरांबा’ मालिकेच्या सेटवर मेकअपमॅन म्हणून कार्यरत असणाऱ्या विशाल कांबळेच्या पत्नीला कानांच्या उपचारांसाठी पैशांची गरज आहे आणि ही गरज ओळखून शशांकने सर्व प्रेक्षकांना व चाहत्यांना मदत करण्याचे आवाहन केलं आहे. याचाच व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Vishal Kamble (@vishal_kamble2374)

आणखी वाचा – 05 January Horoscope : मेष, सीन व कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात शनिवारी होणार सकारात्मक बदल, जाणून घ्या…

या व्हिडीओमध्ये शशांकने असं म्हटलं आहे की, “हा व्हिडीओ करण्यामागचं कारण असं आहे की, विशालच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी कानाचं इन्फेक्शन झालं होतं. ते इन्फेक्शन दोन्ही कानांना झालं. त्यावर ते उपचार घेत होत्या. त्याचा थोडा-अधिक खर्चही झाला. तेव्हा त्यांना थोडं थोडं ऐकूही येत होतं. पण दुर्दैवाने ते इन्फेक्शन तितकंस बरं झालं नाही आणि आता ते इन्फेक्शन वाढल्यामुळे त्यांना पूर्णत: ऐकू येत नाही. ओठांच्या हालचलींवरुन समोरचं माणूस काय म्हणतोय हे त्या ऐकत आहेत. मला खात्री आहे की, त्यांना यापुढे सुद्धा ऐकू येणार आहे. कारण त्यांना डॉक्टरांचा खूप छान सल्ला मिळत आहे. आम्हा सगळ्यांच्या सदिच्छा आहेत, त्यांना ही काही मदत लागेल तीसुद्धा आहेच. पण या उपचारासाठीचे जे पैसे लागणार आहेत ते खूप जास्त आहेत”.

आणखी वाचा – अखेर अक्षरा-अधिपतीची भेट होणार, पण भुवनेश्वरीचा काही वेगळाच प्लॅन, अडथळा येणार का?

यापुढे शशांकने असं म्हटलं आहे की, “पैसे एक रक्कमी देऊन उपचार करणे विशालसाठी अवघड आहे. म्हणून मदत म्हणून जास्त पैसे मिळण्याचे आवाहन करण्यासाठी आम्ही त्याच्याबरोबर आलो आहोत. याआधी त्याने दोन ते तीन लाख खर्च केला आहे आणि आता एकूण वीस लाख खर्च येणार आहे. इतकी मोठी रक्कम एक हाती असणं अवघड आहे. तर यांच्या पाठीशी आपण सगळे उभे राहुया. त्यामुळे त्याला शक्य तितकी मदत आपण करुयात. ज्यांना ज्यांना काही शंका असेल त्यांना विशाल सर्व काही माहिती देईल. तर आपण हा व्हिडीओ व्हायरल करुन त्याला शक्य तितकी मदत होण्यासाठी प्रयत्न करु”.     

Tags: Shashank Ketkar appealing financial helpShashank Ketkar appealing financial help for the ear treatmentShashank Ketkar appealing the ear treatment for makeup man's wife
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bollywood singer Amitabh Bhattacharya legal notice for calling Mahatma Gandhi the 'Father of the Nation of Pakistan

सुप्रसिद्ध गायकाला कायदेशीर नोटीस, महात्मा गांधींना ‘पाकिस्तानचे राष्ट्रपिता’ म्हणणं भोवलं, नक्की प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.