कलाकार हा फक्त पडद्यावर त्याची कला दाखवण्यापुरताच मर्यादित नसतो. सामाजिक आयुष्यात अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये सहभाग घेत समाजाप्रती असणारी कर्तव्य सुद्धा ततो वेळोवेळी पार पाडत असतो. कलाकारांच्या यादीतील समाजाप्रती स्वतःला झोकून देऊन काम करणार व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेते सयाजी शिंदे.(Sayaji Shinde protest)
सयाजी शिंदे आणि त्यांचं असणार निसर्गप्रेम हे जगजाहीर आहे. झाडांसाठी त्यांची असलेली तळमळ आता पर्यंत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. झाडे लावा झाडे जगवा या ब्रिदवाक्याने झपाटलेले सयाजी शिंदे कधीही निसर्गाची होणारी हानी कधीही सहन करत नाहीत अशा परिस्थितीत त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.

पुणे बंगलोर हायवे वरील रस्त्याच्या रुंदीकरना दरम्यान करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले तेव्हा मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने त्याचा त्यांना जास्त त्रास झाला नाही. पण तरीही ते तिथेच थांबून त्याविरोधात लढण्याचे आव्हान लोकांना करत आहेत. यासंदर्भात सयाजी शिंदे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी त्यांना फक्त थोडी इजा झाली आहे असं सांगितल आहे. तर २०० वर्षांपूर्वीची असलेली ही झाडं तोडल्यानंतर या बदल्यात नवीन झाडे लावू असं फक्त कागदी आश्वासन देण्यात येत पण त्याचा कोणताही पाठपुरावा केला जात नाही म्हणून २०० वर्षांपासून उभी असलेली ही निसर्गसंपत्ती नष्ट करण्याचा अधिकार कोणाला नाही असं म्हणत सयाजी शिंदे यांनी या झाडांना वाचवण्यामागचा हेतु स्पष्ट केला आहे.(Sayaji Shinde protest)
====
हे देखील वाचा- कोणतही काम पाहिलं नसताना ‘किती पैसे घेणार? जेव्हा दादा कोंडके मामांना हा प्रश्न विचारतात….
====
सयाजी शिंदे यांनी याआधी ही झाडे जपण्याबाबत महत्वाची पाऊलं उचलली आहेत. त्यांनी वेळोवेळी प्रेक्षकांना, चाहत्यांना हा सल्ला दिला आहे आणि समाजात या बाबत जनजागृती केली. सयाजी शिंदे यांचा ‘घर बंदूक बिर्याणी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिगदर्शक नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिगदर्शन केले असून सयाजी यांच्या सोबत नागराज मंजुळे, आकाश ठोसर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.