अभिनेते संदीप पाठक हे आपल्या निरागस व संवेदनशील अभिनयासाठी ओळखले जातात. ते गेली अनेक वर्ष देश-विदेशातील तसेच राज्यभरातील प्रेक्षकांसाठी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री नाटकाचे प्रयोग करत आहे. त्याचबरोबर आपडी थापडी, विठ्ठल माझा सोबती हे सिनेमे करण्याबरोबर अनेक मालिका व नाटक त्यांनी केल्या आहे. (sandeep pathak)
संदीप पाठक हे बऱ्याचदा आपली सामाजिक बांधिलकीसुद्धा जपताना दिसतात. नाटकांच्या दौऱ्यांवेळी ते स्थानिक लोककलावंतांच्या मुलाखती घेतात. शिवाय विविध उपक्रम राबवताना तळागाळातील लोकांशी घट्ट नाळ जोडत त्यांना आपलेसे करतात.
अभिनेते संदीप पाठक आपल्या मुलांच्या बाबतीत अगदी प्रेमळ असून ते जेव्हा मुलांचे व्हिडिओज सोशल मीडियावर पोस्ट करतात, तेव्हा चाहत्यांना त्यांच्या नात्यातील हे प्रेम अगदी सुखावून जातं. आता संदीप यांनी नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, यात संदीप आपल्या लेकीकडून संस्काराचे धडे गिरवताना दिसतात. संदीपची ही चार वर्षांची मुलगी नक्की आपल्या वडिलांना काय शिकवते, त्यासाठी पहा हा व्हिडिओ… (sandeep pathak video with his daughter)
पहा पाठक पिता-पुत्रीचा हा गोंडस व्हिडिओ (sandeep pathak video with his daughter)
संदीप यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात त्यांची मुलगी स्वरा आपल्या वडिलांना ‘गुरुब्रह्म गुरुविष्णू’ हे स्तोत्र शिकवत आहे. आपल्या गोंडस व सुरेल आवाजात स्तोत्र म्हणणाऱ्या स्वराच्या पाठोपाठ संदीपही हे स्तोत्र म्हणताना या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओला संदीप यांनी ‘SWARA TEACHER 😀’ असं सुंदर कॅप्शन दिलेलं आहे.
संदीप पाठक व त्यांच्या लेकीचा हा गोंडस व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड भावला असून लाईक्स व कमेंट्सद्वारे चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत आहे. अभिनेता संदीप पाठक हे काही दिवसांपूर्वी पंढरपूरच्या वारीत सहभागी झाले होते. तिथे त्यांनी वारकऱ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांच्या रंगात मिसळून गेले. (sandeep pathak)