महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. बरं महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात या हास्यजत्रेचे फॅन आहेत. हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकाराने स्वतःच्या टॅलेंटवर आपला चाहता वर्ग तयार केला आहे. सोशल मीडियावरून ही कलाकार मंडळी नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. प्रत्येक कलाकाराने या कार्यक्रमातून स्वतःची अशी खास ओळख तयार केली आहे. (Samir Choughule Career Incident)
अशातच हास्यजत्रेतील सर्वांचा लाडका विनोदवीर म्हणजेच अभिनेता समीर चौगुले. समीरच्या अभिनयाचे अनेक चाहते दिवाने आहेत. मात्र अभिनय क्षेत्रात सुपरस्टार असणारा समीर हा अपघाताने अभिनय क्षेत्रात आला आहे, चला तर जाणून घेऊया काय आहे तो किस्सा आजच्या जपलं ते आपलं या भागात.
पाहा अभिनयाव्यतिरिक्त करायचं होत या क्षेत्रात समीरला करिअर (Samir Choughule Career Incident)
एका मुलाखतीदरम्यान जेव्हा समीर यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होत का? यावर समीर यांनी उत्तर देत म्हटलं आहे की, नाही असं नाही आहे, आपण कसे धक्का मारल्यावर कुठेतरी पडतो, तसा मी या अभिनयक्षेत्रात येऊन पडलो आहे. मी mulcha स्पोर्ट्स मॅन आहे. मी शाळेत असताना ऍथलेटिक होतो. कबड्डी आणि खो खोच्या टीमचा कॅप्टन होतो. आणि गती स्टेट लेव्हल पर्यंत आम्ही जाऊन आलो आहोत. (Samir Choughule Career Incident)
हे देखील वाचा – प्राजक्ताला आवडते ही व्यक्ती, अखेर केला खुलासा
अभिनयक्षेत्रात येणारा पहिला अनुभव हा माझा परावृत्त करणाराच होता. पहिल्यांदा जेव्हा मी नाटक केलं तेव्हा रंगमंचावर गेल्यावर समोर लोकांची गर्दी पाहून मी माझे डायलॉग्स विसरलो. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात माझ्या मनात अभिनयाबाबत भीती बसली.
समीर चौघुले आज एक उत्तम स्पोर्ट मॅन झाला नसला तरी तो अपघाताने का होईना तो आज मराठी सिनेसृष्टीत सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमासोबत त्यांने अनेक चित्रपटातही काम केलं आहे. छोट्या पडद्यासोबतच त्याने मोठ्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
