मराठी सिनेसृष्टीतील रोमांटिक जोडीपैकी एक जोडी म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब आणि त्याची पत्नी क्षितिजा घोसाळकर. प्रथमेशची पत्नीही अभिनयाक्षेत्रात कार्यरत नसली तरी ती मॉडेलिंगद्वारे वा सोशल मीडियावरुन बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जोडी नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत या जोडीने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. प्रेमाची कबुली दिल्यानंतर तीन वर्षांनी या जोडीने लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. अखेर २४ फेब्रुवारी २०२४ रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकली. (Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar)
अगदी थाटामाटात लग्न करत प्रथमेश व क्षितिजा यांचे फोटो देखील बरेच व्हायरल झालेले पाहायला मिळाले. क्षितिजा व प्रथमेश सोशल मीडियावर सक्रिय असतातच आणि ते त्यांच्या चाहत्यांबरोबर नेहमीच काही ना काही शेअर करत असतात. अशातच प्रथमेश सध्या श्रीवर्धन येथे गेला असल्याचं त्याच्या सोशल मीडिया स्टोरीवरुन पाहायला मिळत आहे. बायकोच्या माहेरी प्रथमेश गेला असल्याचं समोर आलं आहे. लग्नानंतरच्या सणाला म्हणजेच वटपौर्णिमेनिमित्त प्रथमेश व क्षितिजा यांनी श्रीवर्धन गाठलेलं पाहायला मिळालं. बायकोची पहिली वटपौर्णिमा साजरी करतानाचे अनेक फोटो देखील प्रथमेशने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केले आहेत.
यानंतर आता प्रथमेशच्या आणखी एका पोस्टने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतले आहे. सध्या प्रथमेश त्याच्या सासरवाडीला रमलेला पाहायला मिळत आहे. चित्रीकरणाच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढत तो त्याच्या बायकोबरोबर तिच्या गावी पोहोचला आहे. श्रीवर्धनला समुद्रकिनाऱ्यावर फिरतानाचेही त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले आहेत. इतकंच नव्हे तर बायकोबरोबर लॉन्ग ड्राईव्हला जायला सुद्धा त्याने पसंती दर्शवली आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये क्षितिजा बाईक चालवताना दिसत आहे. तर प्रथमेश पाठीमागे बसून या राईडचा आनंद लुटताना दिसत आहे. दोघेही एकमेकांसह वेळ घालवताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. प्रथमेश नेहमीच त्याच्या बायकोचे लाड करताना दिसत असतो. आताही प्रथमेश त्याच्या बायकोबरोबर तिच्या माहेरी तिच्यासह एन्जॉय करताना दिसत आहे.