शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“वर्षा उसगांवकरला उचलून घेतलं तेव्हा…”, पत्नीबाबत खुलेपणाने बोलताना प्रशांत दामलेंनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाले, “तिला असुरक्षित वाटणं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 2, 2023 | 7:54 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actor prashant damle shared some memories about his married and professional life in interview

"वर्षा उसगांवकरला उचलून घेतलं तेव्हा...", पत्नीबाबत खुलेपणाने बोलताना प्रशांत दामलेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले, "तिला असुरक्षित वाटणं..."

आपल्या अभिनयाने ‘नाटकाचे विक्रमादित्य’ अशी वेगळी ओळख निर्माण केलेले एकमेव नाव म्हणजे अभिनेते प्रशांत दामले. प्रशांत दामले हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपट व नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. आजही त्यांच्या नाटकांना ‘हाऊसफुल्ल’ अशी पाटी लागते. प्रशांत दामले हे अभिनेते असण्याबरोबरच निर्मातेदेखील आहेत. त्याचबरोबर ते उत्तम वक्तेदेखील आहेत. (Prashant Damle Interview)

प्रशांत दामले यांनी नुकतीच ‘मित्र म्हणे’ या यूट्यूब चॅनेलवर एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी त्यांच्या वैवाहिक व व्यावसायिक आयुष्याविषयी काही आठवणी शेअर केल्या. यावेळी त्यांना मुलाखतीत पत्नीविषयी मजेशीर प्रश्न विचारण्यात आला. “तुमच्या प्रसिद्धीच्या काळात तुमच्यामागे अनेक चाहत्यांची गर्दी होती, तर यावेळी तुमच्या पत्नीला तुमच्याविषयी कधी असुरक्षितता वाटली नाही का?” असा मजेशीर प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना प्रशांत दामले असं म्हणाले की, “हो नक्कीच. तिला असुरक्षितता वाटली असणार आणि पत्नी म्हणून ही असुरक्षितता असणे अत्यंत स्वाभाविकच आहे. पण आजवर तिने मला याबद्दल कधीही काहीही म्हटले नाही. मी लग्न झाल्यावर अभिनेत्री वर्षा उसगांवकरला उचलून घेतले होते. पण यावर तिने कधीही काहीही विचारलं नाही. या अशावेळी तुमच्या जोडीदारावर विश्वास असावा लागतो. आमच्या लग्नाला आतापर्यंत ३५ वर्षे झाली असून आजवर तिने कधीही मला याबद्दल एक प्रश्न विचारला नाही.”

View this post on Instagram

A post shared by Prashant Damle (@damleprashant)

आणखी वाचा – Video : आधी प्रार्थना बेहरेने आलिबागमध्ये बांधलं आलिशान फार्महाऊस, आता खरेदी केलं नवीन ऑफिस, नवऱ्यासह पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल

यापुढे आपल्या पत्नीविषयी कौतुक करताना ते असं म्हणाले की, “२७ डिसेंबर १९८५ ला माझं लग्न झालं. १९८७ मध्ये मला पहिली मुलगी झाली. अन् १९९२ ला दुसरी मुलगी झाली. त्याचवर्षी मी नोकरी सोडली. त्याआधी मी ५ वर्षं बेस्टमधून सुट्टी घेऊन नाटक करायचो, या पाच वर्षांत आपण कसे जगलो याचं मी अन् माझ्या पत्नीने गणित मांडलं. माझ्या पगाराशिवाय आपण घर चालवू शकतो का याचा अंदाज घेतला. मी फक्त नाटकात काम करत होतो, अभिनय करत होतो, पण घर सांभाळणं हे खूप कठीण काम आहे इतकी वर्षं माझ्या वेळापत्रकाप्रमाणे गौरीने तिचं आयुष्य सांभाळून घेतलं. पण या काळात तिने कधीच कोणत्याच समस्या माझ्यापर्यंत येऊ दिल्या नाहीत.”

आणखी वाचा – “त्यांना चालताही येत नव्हतं अन्…”, वडील रमेश देव यांच्या शेवटच्या क्षणांबाबत अजिंक्य देव यांचा खुलासा, म्हणाले, “तरीही शूटला गेले आणि…”

सध्या प्रशांत दामले यांचे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर गाजत असून गेली अनेक दशके चित्रपट व नाटकांत काम करत ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आजवर इतक्या प्रयोगानंतरदेखील त्यांचा नाटक करण्याचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.

Tags: entertainment newsmarathi actorMarathi newsprashant damle
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Rohan Gujar Wife

"आधीची स्टेज…", 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी देतेय कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराशी लढा, पोस्ट लिहीत म्हणाली, "डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.