वर्षभरामध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट दाखल होतात. यामध्ये मराठीच्या तुलनेत हिंदी चित्रपटांची संख्या काहीशी वरचढ असते. एखादा हिंदी चित्रपट तुफान चालला की, मराठी चित्रपट थिएटरमधून काढूनच टाकायचा हा तर फार जुना वाद आहे. मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नाहीत याबाबत अनेकदा अनेक प्रसिद्ध मंडळींनी बोलून झालं आहे. मात्र आताची सत्य परिस्थिती पाहता हिंदी चित्रपटांनाही हवा तसा प्रेक्षक नाही. बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपट फार काळ टिकत नाही. एखादा चित्रपट चालला तर तुफान चालतो नाहीतर लागोपाठ पाच ते सहा चित्रपट सुपरफ्लॉप ठरतात. मात्र विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने नशिब काढलं. आता याचबाबत अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी भाष्य केलं आहे. (Mahesh manjrekar on Vicky kaushal chhava movie)
विकीचा ‘छावा’ चित्रपट तुफान चालला. या चित्रपटाने ६०० कोटींपेक्षा अधिक कामाई केली. मात्र हे विकीचं यश नसून अवघ्या महाराष्ट्राचं यश आहे असंच काहीसं म्हणणं महेश मांजरेकर यांचं आहे. त्यांनी हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीच्या आताच्या परिस्थितीती बाबत भाष्य करताना सांगितलं. तसेच ‘छावा’ का चालला? याबाबतही त्यांनी त्यांचं मत मांडलं.
आणखी वाचा – “ती हिंदू, भारताची सून, तिच्यावर अन्याय…”, राखी सावंतचा सीमा हैदरला पाठिंबा, पहलगाम हल्ल्यावरुन बरळली
हिंदी चित्रपटसृष्टीला महाराष्ट्राने वाचवलं
मिर्ची मराठीला दिलेल्या मुलाखतीत महेश म्हणाले, “आज जी हिंदी चित्रपटांची परिस्थिती आहे ती फारच दारुण आहे. आज माझ्या महाराष्ट्राने हिंदी चित्रपटसृष्टीला वाचवलं आहे. आज ‘छावा’ तुफान चालत आहे. त्याचं ८० टक्के श्रेय महाराष्ट्राला आहे. ८० टक्क्यांमधलं ९० टक्के श्रेय पुण्याला जातं बाकीचं महाराष्ट्राला जातं. त्यामुळे महाराष्ट्र इंडस्ट्री तारु शकतं. आताचे चित्रपट आलेले चाललेच नाहीत. त्यातल्या त्यात ‘लापता लेडीज’ चित्रपट चांगला चालला. स्टार डॉमिनेटेड इंडस्ट्री जी होती त्यांनाही आता कळायला लागलं आहे की, स्टार्स कमाई करुन देऊ शकत नाहीत”.
विकी कौशलची भूमिका बघायला प्रेक्षक आले त्याला नाही
“विकी कौशल खूप उत्तम अभिनेता आहे. त्याच्या ‘छावा’ चित्रपटाने ८०० कोटी रुपयांची कमाई केली. पण विकी कौशलने कधीच म्हणू नये की, थिएटरमध्ये प्रेक्षक मला बघायला आले. असं असतं तर आधीचे पाच चित्रपटही प्रेक्षक बघायला आले असते. प्रेक्षक आले ते त्याची भूमिका बघायला. त्याचे आधीचे पाच चित्रपट चाललेच नव्हते. तो असं जेव्हा विचारल करेल तेव्हा तो पुढे मोठा होईल. जेव्हा अभिनेत्याला वाटायला लागतं की, फक्त मला बघण्यासाठी प्रेक्षक येत आहेत, त्याचं हेच वाटणं म्हणजे कलाकाराच्या शेवटाला सुरुवात झाली असते”. मराठीमध्ये आम्ही नक्कीच चांगलं काम करु असंही महेश यांनी सांगितलं.