मुंबईत घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि हे स्वप्न प्रत्येकजण पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. सर्वसामान्यांपासून ते अगदी कलाकार मंडळींपर्यंत प्रत्येकजण या स्वप्नपूर्तीच्या मागे असतो. गेल्या वर्षभरात तर अनेक कलाकार मंडळींनी नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केलेली पाहायला मिळाली. अक्षय केळकर, मंगेश देसाई, अश्विनी महांगडे, प्रसाद ओक, गिरीजा प्रभू, मयुरी वाघ या कलाकार मंडळींनी स्वतःच नवं घर घेत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. या पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्याने स्वतःसाठी नव्हे तर त्याच्या आई- बाबांसाठी घर घेतलं आहे. हा अभिनेता म्हणजे भूषण प्रधान. (Bhushan Pradhan New Home)
भूषण प्रधानने त्याचं नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. भूषणने पुण्यात त्याचं नवीन घर घेतलं आहे. भूषणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत त्यात नव्या घराच्या गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी भूषणचे संपूर्ण कुटुंब उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. भूषणने नव्या घराचे फोटो शेअर करत त्याखाली कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “गेल्या सहा महिन्यांनी मला कल्पनेपलीकडचे आशीर्वाद मिळाले आहेत”.
आणखी वाचा – बाप्पा शब्द चुकीचा उच्चारणाऱ्यांवर भडकली जुई गडकरी, राग व्यक्त करत म्हणाली, “बप्पा नसतं ते…”
पुढे त्याने असं म्हटलं आहे की, “माझे दोन्ही चित्रपट ‘जुना फर्निचर’ आणि ‘घरात गणपती’ मनाला भिडले आहेत. ‘जुना फर्निचर’ने आम्हाला आठवण करुन दिली की आमच्या पालकांचे वय वाढत असताना त्यांची काळजी घेण्याची आणि त्यांची काळजी करण्याची आवश्यकता आहे. ‘घरत गणपती’ने पवित्र गणेशोत्सवात कौटुंबिक व एकत्रतेचे सौंदर्य साजरे केले. आम्ही आता ही शुभ गणेश चतुर्थी साजरी करत असताना एक स्वप्न साकार होत असल्याचा मला आनंद होत आहे. मी माझ्या पालकांसाठी नवीन घर खरेदी करण्यास सक्षम आहे”.
आणखी वाचा – लेकाला सोडून भारतात परतताना निवेदिता व अशोक सराफ भावुक, म्हणाल्या, “सर्वात कठीण गोष्ट…”
त्याने पुढे असंही म्हटलं की, “ही जागा त्यांनी माझ्यासाठी वर्षानुवर्षे केलेले सर्व प्रेम, आदर आणि त्याग दर्शवते. जीवन व कला यांचं पूर्ण वर्तुळ तयार झालं आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये प्रतिबिंबित झालेली मूल्ये नेहमीपेक्षा अधिक जोडलेली वाटतात. गणपती बाप्पाने आम्हाला खरोखरच आशीर्वाद दिले आहेत आणि मी तुमच्याबरोबर हे शेअर करण्यासाठी यापेक्षा चांगल्या वेळेचा विचार करु शकत नाही. ही आहे नवीन सुरुवात. अंतहीन कृतज्ञता आणि कौटुंबिक बंध जे कायम टिकतात. गणपती बाप्पा मोरया”. भूषणच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.