शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अविनाश नारकरांवर झाली ‘ही’ शस्त्रक्रिया

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 1, 2023 | 10:50 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Avinash Narkar Surgery

Avinash Narkar Surgery

मराठीतील एव्हरग्रीन अभिनेते अविनाश नारकर नाटक व मालिकांबरोबरच चित्रपटांमध्ये सक्रिय असून या वयातही त्यांचा फिटनेस आजही तरुणांना लाजवणारा आहे. त्याचबरोबर ते सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असून ते नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांच्या रिल्स किंवा फोटोसला चाहत्यांकडून प्रतिसाद मिळतो.(Avinash Narkar Surgery)

अविनाश नारकर यांची छोट्या पडद्यावरील ‘कन्यादान’ ही मालिका सध्या सुरू असून नुकताच त्यांचा ‘फकाट’ हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला, ज्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. अविनाश नारकर सध्या मालिकांच्या शुटींगमध्ये व्यस्त असले, तरी त्यांच्या शूटिंग दरम्यानचा उत्साह तरूणांना लाजवेल असा आहे. पण या एव्हरग्रीन अभिनेत्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झालेली आहे. नेमकं त्यांच्यावर कसली शस्त्रक्रिया झाली ? ते आपण पाहूया…

आषाढी एकादशीच्या दिवशी अविनाश नारकर यांच्यावर डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती त्यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत दिली. ज्यात अविनाश यांच्यासोबत ऐश्वर्या नारकर व प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने हे दिसत आहेत. या फोटोसोबत अविनाश यांनी लिहिलंय, “जय हरि विठ्ठल..!! आज आषाढी एकादशीच्या दिवशी या पांडुरंगाच्या हस्तस्पर्षाने माझ्या दृष्टीची स्पष्टता वाढली…!! विठ्ठल विठ्ठल I जय हरि विठ्ठल”.

अविनाश यांच्यावर डॉ. तात्याराव लहानेंच्या नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली असून डॉक्टरांकडून त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे ते काही दिवस आपल्याला मालिकेत दिसणार नाहीत. अविनाश यांच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.(Avinash Narkar Surgery)

९०च्या दशकात रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या अविनाश नारकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, चित्रपट व छोटा पडदा या तीनही माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या नारकरही छोट्या पडद्यावर सक्रिय असून सध्या सुरु असलेली ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील खलनायिकेची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. ह्या दोघांची जोडी जितकी एव्हरग्रीन आहे, तितकीच ती फिटनेस फ्रिकदेखील आहे.

Tags: aishwarya narkaravinash narkaravinash narkar in hospitalavinash narkar latest photoits majjatatyarao lahane
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Sudesh Bhosle Birthday Special

अमिताभ यांच्या आवाजासाठी ओळखले जातात पण त्याच आवाजामुळे सुदेश यांना एकदा आलं होत डिप्रेशन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.