एखाद्या व्यक्तीच्या यशावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या भाष्य करणं ही वृत्ती बरेचदा अनेक जणांमध्ये पाहायला मिळते. सर्वसामान्य व्यक्ती असो वा कलाकार मंडळी वरचढ ठरणाऱ्या व्यक्तींबद्दल प्रत्येकाच्या मनात काही ना काही भाव हे येतच असतात. बर असं असलं तरी या सगळ्याला दोन व्यक्ती या कायम अपवाद ठरल्या. मराठी सिनेमाविश्वात एक काळ गाजवलेले हे दोन कलाकार म्हणजे अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे.(Ashok saraf Share Incident)
अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आजवर इतक्या चित्रपटात काम केलंय मात्र त्यांच्यात कधीच दुरावा आला नाही, वा एखाद्या गोष्टीवरून बाचाबाची झाली नाही. या जोडगोळीने कायमच एकमेकांना आदर दिला आणि सिनेविश्वात काम करून नाव कमावलं. हे दोन्ही कलाकार सुपरस्टार म्हणून प्रेक्षकांच्या नजरेत आजही आहेत. आज लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका लक्षा आपल्यात नसला तरी वेळोवेळी त्याची आठवण आल्यावाचून राहत नाही. सिनेमाविश्वात लक्ष्मीकांत आणि अशोक यांच्या मैत्रीचे उदाहरण आजही दिल जात.
पाहा का म्हणाले अशोक मामा लक्षाला ‘टायमिंगचा हिरो’ (Ashok saraf Share Incident)
एका मुलाखती दरम्यान अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बद्दल भाष्य करत त्यांना टायमिंगचा हिरो म्हणत त्यांची आठवण काढली. बनवाबनवी चित्रपटाबद्दल बोलत असताना अशोक मामांनी लक्ष्मीकांत यांचा एक किस्सा शेअर केला, यावेळी लक्ष्मीकांत टायमिंगचा हिरो कसा होता याचा उलगडा त्यांनी केला.(Ashok saraf Share Incident)
यावेळी बोलताना अशोक मामा म्हणाले की, अशी ही बनवाबनवी सिनेमातील धनंजय माने इथेच राहतात का हा संवाद लिहिला होता पण त्यावेळी लक्षाच जे टाइमिंग होतं ना, की दरवाजा फिरवून पटकन दार वाजवणार हे इतकं उत्कृष्ट जमून गेलं, लोकांनाही ते फार आवडलं आणि इथेच दिसून येतं की लक्ष्मीकांत खरा टाईमिंगचा हिरो होता असं अशोक सराफ म्हणाले.
हे देखील वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आकाश ठोसर
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘अफलातून’, ‘धुमधडाका’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘बनवाबनवी’, ‘ठण ठण गोपाळा’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये अशोक मामा आणि लक्षाची जोडी पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरलं. उत्तम कलाकार म्हणून आजही अशोक मामा, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याकडे आदराने पाहिलं जात.(Ashok saraf Share Incident)
अशोक मामा यांना हल्लीच जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या या सोहळ्याला अशोक मामा भावुक झालेले पाहायला देखील मिळाले.
