एखाद्या कलाकाराला प्रसिद्ध होण्यासाठी कधी कधी एक ओळ हे पुरेशी असते, तर एखादा कलाकार अनेक कामं करून देखील चाहत्यांच्या मनात घर करण्यास सफल होत नाही. पण एक नाव आपल्या मनोरंजन क्षेत्रात असं आहे ज्यांना न ओळखणारी माणसं क्वचितचं पाहायला मिळतील. ते नाव म्हणजे सदाबहार अभिनेते अशोक सराफ. महाराष्ट्रभर आपल्या अभिनयाने घराघरात पोहचलेले अशोक सराफ यांना एका राजकारणातील व्यक्तीने भर मंचावर हे काय कामं करतात असा प्रश्न विचारला होता आणि मग त्या नंतर मामांची रिअक्शन काय होती हे त्यांनी त्यांच्या बहुरूपी या आत्मचरित्रात लिहिलं आहे.(Ashok Saraf Insulte Incident)

म्हणून मामा भाडकले..(Ashok Saraf Insulte Incident)
अशोक सराफ एकदा मुंबई मधील एका कार्यक्रमाला ते गेले होते. कार्यक्रमाला पोहचले तेव्हा कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी अशोक सराफ यांच्या भोवती जमली. आजूबाजूचे लोक, घराच्या खिडकीतून, टेरेस वरून डोकावून अशोक सराफ यांना पाहू लागले. कस बस अशोक सराफ यांना एका रूम मध्ये बसवण्यात आलं. तिथे त्यांना हवं नको ते विचारत असताना आणखी एका गृहस्तांना तिथे बसवण्यात आलं आणि आयोजकांनी सांगितलं हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. ते गृहस्थ राजकारणात सक्रिय असल्याचं अशोक सराफ यांना माहिती होतं. जेव्हा आयोजकांनी त्या राजकारणी गृहस्तांना अशोक सराफ यांची ओळख करून दिली तेव्हा त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर अशोक मामा चांगलेच भडकले.
समोरच्या व्यक्तीने अशोक सराफ यांना संबोधून ‘काय करतात हे?’ असा प्रश्न विचारला. त्यावर अशोक सराफ यांनी विचार केला कि माझे चित्रपट एकवेळ माहित नसतील हे मी मान्य करतो पण महाराष्ट्र राज्याचा एक मराठी नेता आणि ह्यांना मराठी अभिनेत्याचं नाव ही माहिती असू नये. हा प्रश्न अशोक सराफ यांच्या काही पचनी पडला नाही. पण या घडलेल्या प्रसंगातून ‘कितीही कामं केलं, नाव कमावलं तरीही पाय मात्र जमिनीवरच असावेत’ ही मोठी शिकवण मिळाल्याचं ही अशोक मामांनी पुढे सांगितलं.(Ashok Saraf Insulte Incident)

अभिनयाचं वारं ज्याच्या अंगी भिनल त्या कलाकाराची मजबूत बाजू ही अभिनय आणि कमकुवत बाजू ही अभिनयचं असतो. कलेला अग्रस्थानी ठेऊन कलेशी नाळ जोडून राहिलेले मराठी इंडस्ट्रीतील महानायक अभिनेते अशोक सराफ. पांडू हवालदार ते अगदी हल्लीच ‘वेड’ मधील छोट्या झलकेने वर्षे गेली तरी विनोदाची वेळ अजून तिचं अगदी जिथं हवी तिथे याची जाणीव मामांच्या अभिनयातून होते. संपूर्ण मनोरंजन विश्व अशोक सराफ याना मामा म्हणून ओळखत. आजही ठराविक घटकांना विचारलं की तुमच्या आवडत्या कलाकारांच्या यादीतील एखादं नाव सांगा तर हक्काने अशोक मामा असं सांगितलं जात.
हे देखील वाचा – पुन्हा एकदा मामांचा मिश्किल लुक, प्रेक्षकांना आठवला मामांचा जुना अंदाज
मंडळी अशोक सराफ हे नाव लक्षात राहण्यासाठी अशोक सराफ यांचा एखाद चित्रपटाचा पुरेसा आहे बाकी त्यांचा अभिनय, विनोदाचं अचूक टायमिंग त्यांना चिरकाल प्रेक्षकांच्या मनात राहण्यासाठी कारणीभूत ठरत.