बुधवार, जुलै 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पायलट भाचीकडून स्पेशल Announcement, पद्मश्री अशोक सराफ यांचे विमानप्रवासात कौतुक, म्हणाली, “आजचा प्रवास…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 29, 2025 | 10:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashok Saraf

पायलट भाचीकडून स्पेशल Announcement, पद्मश्री अशोक सराफ यांचे विमानप्रवासात कौतुक, म्हणाली, "आजचा प्रवास…"

Ashok Saraf : मराठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा पद्मश्री पुरस्काराने सत्कार करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा मनाचा सन्मान देण्यात आला. आजवरच्या अशोक सराफ यांच्या अभिनय कारकिर्दीतील यशासाठी हा पुरस्कार होता. २७ मे रोजी राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम पार पडला. अशोक सराफ यांच्या प्रत्येक चाहत्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण होता. या पुरस्कारानंतर हा खास क्षण व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत त्यांनी आपल्या भावनादेखील शेअर केल्या आहेत. या सगळ्यात अशोक सराफ यांचा विमान प्रवासादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आणि या व्हिडीओने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत.

अशोक सराफ त्यांच्या कुटुंबासह दिल्ली येथे पुरस्कार सोहळ्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना विमानप्रवासादरम्यान एक सुंदर असा क्षण त्यांना अनुभवता आला. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची भाची अदिती परांजपे ही पायलट आहे. आणि अशोक सराफ पद्मश्री पुरस्कार घेऊन परतत असताना त्या विमानाची पायलट ही अदिती होती. त्यावेळी अदिती परांजपेने विमानात खास उद्घोषणा करुन अशोक सराफ यांचे अभिनंदन केले. अशोक सराफ यांनीही अदितीचे आभार मानत विमानात उपस्थित असलेल्या सर्वांना उभं राहत नमस्कार केला.

आणखी वाचा – वैष्णवीचे नको ते चॅट हाती, चारित्र्यावर शंका आणि…; हगवणेंच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद, नेमकं सत्य काय?

View this post on Instagram

A post shared by अदिती (@aditi.paranjpe07)

सध्या अदिती आणि अशोक सराफ यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अदिती म्हणते की, “नमस्कार! मी फ्लाइट कॅप्टन अदिती परांजपे. दिल्ली टू मुंबई या विमान प्रवासात तुमचे सर्वांचे स्वागत. आजचा प्रवास माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण माझे काका अशोक सराफ हे माझ्याबरोबर या विमानातून प्रवास करणार आहेत. ज्यांचा नुकताच पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आले आहे. याचा मला अभिमान वाटतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करावे”.

आणखी वाचा – हिना खान ते महिमा चौधरी…; दीपिका कक्करच्या आधी ‘या’ अभिनेत्रींनी दिली आहे कॅन्सरशी झुंज, मृत्यूशी लढा आणि…

अदिती परांजपेने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून त्याला खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, “एक अतिशय खास, भावनिक आणि आयुष्यात एकदाच येणारी फ्लाइट.अशोक काका तुमच्याबरोबर प्रवास करताना मला अभिमान वाटतोय. पुन्हा एकदा तुमचे हार्दिक अभिनंदन”.

Tags: ashok sarafentertainmentmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dev anand son suneil anand dies
Entertainment

देव आनंद यांच्या मुलाचे निधन, ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अविवाहित राहिले कारण…

जुलै 29, 2026 | 10:34 am
 Badshah Isha Rikhi Marriage in Trouble
Entertainment

“मी गप्प राहिले कारण मला भीती वाटत होती”, सुप्रसिद्ध गायकाच्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न…

जुलै 28, 2026 | 10:24 am
stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Next Post
Prachi Pisat Sudesh Mhashilkar Controversy

ज्येष्ठ अभिनेत्याच्या अश्लील मॅसेज प्रकरणी प्राची पिसाटचा युटर्न?, नेटकरीही संभ्रमात, म्हणाली, "चुकीचे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.