चित्रपट मालिके नंतर आता कलाकार मंडळी ही वेबसीरिज कडे वळली आहेत.

लॉकडाऊनच्या कळत तर वेबसीरिज हेच मनोरंजनाचं साधन होत आणि तेव्हापासून साऱ्यांचा कल हा वेबसीरिजकडे अधिक आहे.

अशातच रहस्यमय आणि थरारक अशा असुर या वेबसीरिजने चांगलाच धुमाकूळ घातला होता.

विशेष म्हणजे या वेबसीरिज मधील मराठमोळा अभिनेता अमेय वाघच्या भूमिकेची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर सार्यांना वेध लागले ते या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचे.

अमेय वाघ ने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या स्टोरीवरून असुर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची कुणकुण लागलीय.

अमेय ने त्याच्या हाताच्या दोन बोटांवर असुर २ असं लहिलेला फोटो शेअर केला आहे. यावरून ही वेबसीरिज लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय.

या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये आता कोणती रहस्य गूढ उलगडणार, अमेयची असलेली भूमिका हे सारं पाहणं लक्षवेधील ठरेल.