रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठीत नव्या चित्रपटाची घोषणा, ‘RD’चा ट्रेलर प्रदर्शित, नवोदित कलाकारांची जुगलबंदी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 17, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
RD Official Trailer

मराठीत नव्या चित्रपटाची घोषणा, 'RD'चा ट्रेलर प्रदर्शित, नवोदित कलाकारांची जुगलबंदी

RD Official Trailer : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत चर्चा सुरु आहे ती म्हणजे थरारक अशा ‘आरडी’ चित्रपटाची. आरडी चित्रपटाच्या पोस्टरने, ट्रेलरने सध्या सर्वत्र हवा केली आहे. नव्या दमाचे कलाकार आणि थरारक कथानक असलेल्या ‘आरडी’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. आणि या ट्रेलरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रेमकथा, ऍक्शन, गाणी असा पुरेपूर मसाला असलेला हा चित्रपट येत्या २१ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अर्थातच या चित्रपटाच्या दमदार ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता अधिक वाढवली.

तारुण्याच्या काळात आकर्षण आणि उत्साहाच्या भरात काहीवेळा हातून चूका घडतात. अशा एखाद्या चुकीबद्दल माफी न मागितल्यास पुढे त्याचे विचित्र परिणामही होऊ शकतात. अशाच ध्यानी मनी सुद्धा नसलेल्या विचित्र परिणामांची थरारक गोष्ट ‘आरडी’ या चित्रपटात मांडण्यात आल्याचं ट्रेलरवरुन दिसतंय. नावामुळेच आधीच उत्सुकता निर्माण केलेल्या या चित्रपटाविषयीचं कुतूहल आता आणखी वाढलं आहे. थरारक आणि रंजक या पलीकडे चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज बांधता येत नाही. रोमान्स, ऍक्शन, गाणी अशी मनोरंजनाची संपूर्ण मेजवानी या चित्रपटात आहे.

आणखी वाचा – वैष्णोदेवी परिसरात ओरीची दारू पिऊन पार्टी, हॉटेलमध्ये मिळाले पुरावे, पोलिसांत तक्रार दाखल कारण…

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

‘साद एंटरटेन्मेंट’, ‘कमल एंटरप्रायझेस’ यांनी ‘झेब्रा पिक्चर्स’ आणि ‘हेलिक्स प्रॉडक्शन्स’ यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख  हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे,विजयकांता दुबे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखाते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहे.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ला अधिकाधिक पुरस्कार न मिळण्यावरुन प्रेक्षकांची नाराजी, मालिका अव्वल स्थानावर तरीही…

‘आरडी’ या चित्रपटात नव्या दमाचे कलाकार असले तरी त्यांच्या अभिनयात कुठेही नवखेपणा जाणवत नाही. उलट एक वेगळा प्रयोग व्यावसायिक पद्धतीनं केल्याचं ट्रेलरवरुन दिसत आहे. त्यामुळे ‘आरडी’ या चित्रपटाची नेमकी कथा काय असा प्रश्न या ट्रेलरने निर्माण केला आहे.आता या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी २१ मार्चला चित्रपटगृहात जावं लागणार आहे हे मात्र नक्की.

Tags: marathi movieRD Official TrailerRd Trailer
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Sagar Karande Post

कधीच स्त्री पात्र साकारणार नसल्याची सागर कारंडेची घोषणा, पण नक्की झालं काय?, म्हणाला, "यापुढे मी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.