बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉक्स ऑफिसवर हिट झालेला ‘शैतान’ आता ओटीटीवर यायला सज्ज, कधी व कुठे पाहता येणार हा चित्रपट? जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 29, 2024 | 5:08 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ajay Devgn and R Madhavan starrer 'Shaitan' will release soon on OTT see the details

बॉक्स ऑफिसवर हिट झालेला ‘शैतान’ आता ओटीटीवर यायला सज्ज, कधी व कुठे पाहता येणार हा चित्रपट? जाणून घ्या...

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण व आर. माधवन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘शैतान’ हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. काळी जादू, वशीकरण यावर आधारित असलेल्या या कथानकाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली. तसेच या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बॉक्स ऑफिसवर गाजलेला हा चित्रपट आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

त्यामुळे ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहता आला नव्हता त्यांना आता हा घरबसल्या ओहता येणार आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर तब्बल २१५ कोटींची कमाई केली आहे. आजपर्यंत नायक म्हणून लोकप्रिय ठरलेल्या आर माधवनने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. ‘शैतान’ ओटीटीवर कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

आणखी वाचा – “उगाच मालिका वाढवत आहेत”, ‘सातव्या मुलीची…’मधील विरोचक व देवीआईच्या कथेमधील ट्वीस्ट पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “फक्त मुर्खपणा…”

‘शैतान’ हा चित्रपट येत्या ३ मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे. शैतान हा भय व थरारपट ‘वश’ या गुजराती चित्रपटाचा रीमेक आहे. ‘वश’ हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता, परंतु हा चित्रपट मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही. ‘वश’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या जानकी बोडीवालाने ‘शैतान’मध्येसुद्धा जान्हवी हे पात्र साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

आणखी वाचा – “तेच तेच कंटाळवाणं”, निलेश साबळेचा नवा शो पाहून प्रेक्षकांमध्ये निराशा, ओंकार भोजने-भाऊ कदमला पाहून म्हणाले, “स्त्रियांची भूमिका…”

दरम्यान, हा चित्रपट अंधविश्वास, काळी जादू, वशीकरण या सर्व गोष्टींवर आधारित असल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटात अजय देवगण एका पित्याची भूमिका साकारत आहे. तर आर. माधवन वनराज नावाच्या खलनायकाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात ज्योतिका सदाना-सर्वणन, जानकी बोडीवाला, अंगद राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Tags: bollywood movieott entertainment newsShaitan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Aai Kuthe Kay karte Promo

आशुतोषच्या आठवणीत अरुंधतीला अश्रू अनावर, देशमुखांचं घरही सोडणार, कसं असणार पुढचं आयुष्य?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.