शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : IPLच्या मॅचदरम्यान मैदानातच कुत्र्याला सुरक्षारक्षकांकडून लाथेने तुडवलं, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “टीव्हीवर हे दाखवणं…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 28, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Abhidnya bhave commented on the inhumane treatment given to dog in Mumbai vs Gujarat ipl match

Video : IPLच्या मॅचदरम्यान मैदानातच कुत्र्याला सुरक्षारक्षकांकडून लाथेने तुडवलं, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, "टीव्हीवर हे दाखवणं..."

रविवार, २४ मार्च २०२४ रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान मैदानात एक कुत्रा आला होता. यावेळी कुत्र्याला मैदानातून हाकलवण्यासाठी अनेक लोक त्याचा पाठलाग करत होते. यावेळी काही लोकांनी त्या कुत्र्यांवर हल्ला केला.  ‘स्ट्रीट डॉग्स ऑफ बॉम्बे’ च्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात आयपीएलमधील सुरक्षा व ग्राउंडच्या कर्मचाऱ्यांकडून कुत्र्यावर हल्ला होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

कुत्र्याबाबत झालेल्या या वागणुकीवर अनेकांनी आपला निषेध व्यक्त केला आहे. यावर अभिनेता वरुण धवनने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वरुणने या व्हिडीओद्वारे स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांवर टीका करत असं म्हटलं आहे की, “हा काय मूर्खपणा आहे? कुत्रा हा काही फुटबॉल नाही. जर कुत्रा कोणाला चावत नाही, किंवा कोणतीही इजा करत नाही. तर त्याला बाहेर काढण्यासाठी आणखी चांगला मार्ग नव्हता का?” 

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा शिवसेनेमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निर्णय, म्हणाला, “माझ्या वनवासानंतर…”

अशातच आता मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेनेही तिच्या सोशल मीडियाद्वारे या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अभिज्ञाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर “लाईव्ह कॅमेरा हे कधीही टीव्हीवर दाखवणार नाही असं लिहिलं आहे. तसेच या व्हिडीओद्वारे “आपण माणूस म्हणून अपयशी ठरत आहोत का?” असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. याच व्हिडीओवर अभिज्ञाने तिची भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “हे प्रत्यक्षात घडले यावर विश्वास बसत नाही”

आणखी वाचा – Video : बऱ्याच दिवसांनी बायको-लेकासह पुण्याच्या घरी पोहोचला शशांक केतकर, आईने बनवली सालपापडी, म्हणाला, “तांदूळ भिजवून…”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाण्यात मुक्या प्राण्यांच्या ग्रूमिंग सेशन सेंटरमध्ये कर्मचाऱ्याने एका श्वानाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. हा धक्कादायक प्रकार समोर येताच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आशातच आता हाअ व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण यावर टीका, नाराजी, दु:ख  त्याचबरोबर निषेध व्यक्त करत आहेत.
 

Tags: abhidnya bhavemarathi actressMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Today 29 march 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आजचे राशी भविष्य : 'मेष' ते 'मीन'पैकी कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार आज आर्थिक यश?, तुमचा आजचा दिवस कसा असणार? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.