सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूड सेलिब्रिटींसह मराठी अभिनेत्रीलाही राम मंदिर सोहळ्याची निमंत्रण पत्रिका, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 9, 2024 | 5:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rupali Bhosale On Shri Ram Mandir

बॉलिवूड सेलिब्रिटींसह मराठी अभिनेत्रीलाही राम मंदिर सोहळ्याची निमंत्रण पत्रिका, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

रामजन्मभूमी अयोध्यातील बहुप्रतीक्षित ऐतिहासिक श्री राम मंदिर अवघ्या काही दिवसांत भक्तांसाठी खुले होणार आहे. या भव्य दिवसाची सारे भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे. मंदिर परिसरात राम लल्लाच्या मुर्तीच्या प्राण प्रतिष्ठेच्या भव्य समारंभाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरु आहे. राम मंदिराबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे. (Rupali Bhosale On Shri Ram Mandir)

१६ जानेवारीला भव्य उद्घाटनापूर्वी अनेक कार्यक्रम सुरु होणार असल्याचं समोर आलं आहे. ४००० साधू-संतांसह देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ७००० पाहुण्यांनाही या शुभ सोहळ्यासाठी आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. या नेत्रदिपक कार्यक्रमात अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. दरम्यानच्या काळात अनेक सेलिब्रेटींना त्यांना मिळालेल्या निमंत्रणाची झलक आपल्या चाहत्यांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.

आणखी वाचा – कुटुंबासह देवदर्शनानंतर कामाला लागले आदेश बांदेकर, व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकरी म्हणाले, “समृद्धी महामार्ग…”

View this post on Instagram

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

अशातच एका मराठमोळ्या व लोकप्रिय अभिनेत्रीलाही श्री राम मंदिरच्या सोहळ्यसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रुपाली भोसले हिला या सोहळ्याची खास निमंत्रण पत्रिका आली आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. “जय श्री राम. अक्षत निमंत्रण” असं कॅप्शन देत तिने निमंत्रण पत्रिकेची झलक शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत ‘जय श्री राम’ असं लिहिलं आहे.

आणखी वाचा – “तर लोक तुम्हाला मान का देतील?”, मराठी कलाकारांना राज ठाकरे यांनी चांगलंच सुनावलं, म्हणाले “अद्या, फद्या, अंड्या बोलता अन्…”

रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अक्षय कुमार, सनी देओल, अजय देवगण, प्रभास, आयुष्मान खुराना, टायगर श्रॉफ, यश तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी, संजय लीला यांसारखे सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आणखीही मराठमोळ्या कलाकारांना या सोहळ्याच्या आमंत्रण आलेलं पाहायला मिळत आहे.

Tags: marathi actressmarathi serialrupali bhosalerupali bhosale on shri ram mandirshri ram mandir ayodhya
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
marathi actor sankarshan karhade shared his play’s experince see the video

Video : संकर्षण कऱ्हाडेचं त्याच्या परभणीमधील गावामध्ये सनई-चौघड्यांनी स्वागत, अभिनेताही भारावला, म्हणाला, "माझ्याच गावात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.