रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आमिर खानचा मराठमोळा जावई व त्याची आई एअरपोर्टवरच खाऊ लागले भेळ व दाबेली, जपला साधेपणा, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जून 26, 2024 | 4:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aamir Khan's son-in-law Nanupur Shikhar shared a video eating bhel and dabeli with his mother at the airport.

Video : आमिर खानचा मराठमोळा जावई व त्याची आई एअरपोर्टवरच खाऊ लागले भेळ व दाबेली, जपला साधेपणा, व्हिडीओ व्हायरल

आमिर खानची लेक आयरा खानने काही महिन्यांपूर्वी नूपुर शिखरेबरोबर विवाहगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. आपल्या लग्नामुळे चर्चेत  आलेला नूपुर सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. नूपुर हा लोकप्रिय फिटनेस ट्रेनर आहे. त्यामुळे अनेकदा तो सेलिब्रिटींबरोबरचे फिटनेसचे फोटो व व्हिडीओही शेअर करत असतो. त्याच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो.  

नूपुर अनेकदा त्याचे मजेशीर रील व्हिडीओही पोस्ट करत असतो आणि बऱ्याचदा त्याच्या रील व्हिडीओमध्ये त्याची आई प्रीतम शिखरेदेखील असतात. या माय-लेकाचे व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘माझ्याशी नीट बोलायचं’ या ट्रेंडिंग गाण्यावरही रील व्हिडीओ केला होता. या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता.  यात प्रीतम यांचा निवांत व कूल अंदाज पाहायला मिळाला होता, तर दुसरीकडे नुपूर मात्र घरातली कामं करताना दिसला. नूपुर व प्रीतम या माय-लेकाची ही मस्ती चाहत्यांना विशेष आवडते.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – मुस्लिम मुलाशी लग्न केल्यानंतर लेकीला धमकी व ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हांचं उत्तर, म्हणाले, “माझ्या मुलीने बेकायदेशीर असं…”

अशातच हे दोघे माय-लेक कुठेतरी फिरायला जात असतानाचे काही खास क्षण नूपुरने शेअर केले आहेत. नूपुरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे “ट्रीपला सुरुवात झाली” असं म्हणत त्याच्या आईबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. तर दुसऱ्या स्टोरीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये हे दोघे भेळ व दाबेली खात असतानाचे पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये नूपुर आपल्या आईला “आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊन भेळ आणि कच्ची दाबेली कोण खातं?” असं विचारतो. यावर नूपुरच्या आई “मी चांगली खिचडी देत होती तुला” असं म्हणते.

आणखी वाचा – Video : नणंदने काढली सोनाक्षी सिन्हाची नजर, अभिनेत्रीला कोसळलं रडू, एकमेकींना मिठी मारली अन्…

या व्हिडीओमधून नूपुर व त्याच्या आईचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे. साध्या मराठी कुटुंबातली आई बाहेर जाऊनही घरातल्या जेवणाची जशी आठवण करते. अगदी तसंच नूपुरची आईही बाहेर जाताना लेकाकडे घरातल्या जेवणाची आठवण करत आहे. त्यामुळे अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे. दरम्यान, नुपूरबद्दल बोलायचं झाल्यास त्याने आमिर खानची लेक आयराशी ३ जानेवारी २०२४ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर १० जानेवारीला दोघांनी मित्र-मैत्रिणी व कुटुंबियांच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये लग्न केलं होतं.

Tags: aamir khanmarathi entertainment newsNupur Shikhar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 air conditioner health risks
Lifestyle

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

एप्रिल 26, 2026 | 4:00 pm
 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
Next Post
sonakshi sinha wedding

शेवटी बापच तो! लेकीचं कन्यादान करताना शत्रुघ्न सिन्हांच्या डोळ्यांत पाणी, जावयाच्या हाती मुलीचा हात देताना भावुक, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.