बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र गेल्या काही वर्षात त्याचा एकही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. २०२२मध्ये त्याला ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानेही प्रेक्षकांना निराश केलं. यानंतर आमिर नवीन काय घेऊन येणार? याबाबच सिनेरसिक आतुर होते. त्याने ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात काय पाहायला मिळणार? याविषयी सारेच उत्सुक होते. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र याबाबत काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे. पण हे नक्की प्रकरण काय? याबाबत सविस्तर माहिती समोर आली आहे. (Aamir khan sitaare zameen par boycott)
‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर कौतुकास्पद असूनही बऱ्याच प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे भलतीच प्रतिक्रिया दिली. चित्रपटाचा्र. ट्रेलर कौतुकास्पद असूनही का ट्रेलर समोर आल्यानंतर #BoycottSitaareZameenPar सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. पण हे करण्यामागचं कारण तुर्की ठरलं आहे. भारत-पाकिस्तान तणावाचं कनेक्शन सगळ्यांनी आमिरच्या चित्रपटाशी जोडलं. आमिरचा जुना वाद प्रेक्षकांना आठवला. त्यांनी थेट बॉयकॉटची मागणी करण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा – वोडकाची नदी वाहते, रशियन दारू पिऊन पडतात, उलट्या अन्…; सलमान खानच्या पार्टीचं धक्कादायक सत्य समोर
जो टर्की का यार है वो देश का गद्दार है, सितारे जमीं पर, इसको जमीन पर ही लाना है #BoycottTurkey#BoycottSitaareZameenPar pic.twitter.com/LfdcVjQ7m8
— Shubhangi Pandit (@Babymishra_) May 14, 2025
२०२०मध्ये आमिर तुर्कीमध्ये गेला होता. यादरम्यान तो तुर्कीची फर्स्ट लेडी एमिन एर्दोगनला भेटला. यावेळी त्यांची मैत्री पाहायला मिळाली. याचबाबत आता प्रेक्षकांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला तुर्की देशाने पाठिंबा दिला आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुर्कीने पाकिस्तानला दिलेला पाठिंबा भारतीयांच्या मनावर घाव घालणारा ठरला. हेच नेटकऱ्यांनी अगदी लक्षात ठेवलं.
आणखी वाचा – “तो काही शाहिद आफ्रिदी नाही”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर बोलताच जावेद अख्तर ट्रोल, असं काही म्हणाले की…
आमिरचा ट्रेलर समोर येताच नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या. तुम्हाला आठवतं का? आमिर खान तुर्कीला गेला होता. तिथे फर्स्ट लेडीला भेटला होता. आता तुम्हाला माहितच आहे की, त्याच्या चित्रपटाबरोबर नक्की काय करायचं आहे? अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. २०२२मध्ये आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाबाबतही असंच झालं होतं. बरीच वर्ष चित्रपटासाठी मेहनत करुनही आमिरचा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. आता ‘सितारे जमीन पर’बरोबरही तेच घडणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.