शनिवार, एप्रिल 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे काय करते’मधील यशची खऱ्या आयुष्यातील पत्नी कोण?, २०१८ मध्ये कोर्ट मॅरेज केलं अन्…

Ankita Shindeby Ankita Shinde
सप्टेंबर 7, 2023 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abhishek & krutika love story

Abhishek & krutika love story

सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी कलाक्षेत्रातीलच व्यक्तींशी लग्न केलं आहे. अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्या प्रेमाचे सूरही अभिनय क्षेत्रातच जुळले. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक नावाजलेल्या जोडपी पाहायला मिळतात. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील यश हे पात्र साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुखचीही हटके प्रेमकहाणी आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेली ‘ताली’ ही हिंदी वेबसीरीज प्रेक्षकांच्या विशेष पसंती पडली. या वेबसीरिजमध्ये गौरी सावंत यांच्या बालपणाची भूमिका कृतिका देवने साकारली. कृतिका अभिषेकची पत्नी आहे. या दोघांची लव्हस्टोरी नेमकी काय आहे हे जाणून घेऊया.(Abhishek & krutika love story)


अभिषेक व कृतिका हे दोघेही पुण्यामध्ये अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आले होते. रंगभूमी जसं एका कलाकाराला उत्तम भूमिका पार पाडण्यासाठी बळ देते तसंच रंगभूमीने या दोघांना एकत्र आणलं. कृतिका ही अभिनय कार्यशाळेत होती त्या दरम्यान अभिषेकची नाटकाची टीम कार्यशाळेतील मुलांशी संवाद साधण्यासाठी आली होती. त्याचवेळी त्या दोघांची मैत्री झाली.

View this post on Instagram

A post shared by Abhishek Deshmukh (@abhisheksdeshmukh)


त्याच नाटकाच्या दरम्यान अभिषेकच्या रंगभूमीवरचा वावर कृतिकाच्या पसंतीस उतरला. अनेक एकांकिका आणि नाटकात त्यांनी एकत्र काम केलं. एका नाटकाचा दौरा श्रीलंकेला होता. त्या दौऱ्यादरम्यान त्यांची मैत्री अगदी घट्ट झाली. एकदा नाटकाची तालीम सुरु असताना कृतिकाला हिंदी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं होत. नाटकाची तालीम पुण्यात सुरु होती आणि ऑडिशन देण्यासाठी मुंबईला बोलावलं होत. कृतिका गोंधळात पडली पुण्यावरून मुंबईला कसं जायचं? असा प्रश्न तिला पडला. हे सगळं तिने अभिषेकला सांगितलं आणि तेव्हा अभिषेक म्हणाला, ‘मी तुझ्याबरोबर येतो. आपण ऑडिशनला जाऊया’.

आणखी वाचा :- डोळ्यात पाणी, भावुक अन्…; सई ताम्हणकरने खरेदी केलं नवीन घर, जुन्या घराचा निरोप घेताना म्हणाली, “मला खरंच…”


मुंबई-पुणे प्रवासात त्या दोघांना एकमेकांबद्दलच्या प्रेमाची जाणीव झाली. ऑडिशनला गेल्यानंतर कृतिकाचा अभिनय चित्रपटाच्या दिग्दर्शकला आवडला आणि तीची ‘हवाईझादा’ या चित्रपटासाठी निवड झाली. त्या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाही होता. अभिनय क्षेत्रात पुढे जाण्यासाठी अभिषेक कृतिकाला मागर्दर्शन त्याचबरोबर प्रोत्साहित करत होता. मैत्री असताना त्यांनी एकमेकांना प्रपोज न करता लग्न करण्याचं ठरवलं. २०१८ साली कुटुंब आणि मित्र- मैत्रिणींच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केलं. आज दोघंही अगदी सुखाचा संसार करत आहे.

Tags: aai kute kay karteabhishek deshmukhkrutika deolovestorymarathi coupletaali web series
Ankita Shinde

Ankita Shinde

Latest Post

randeep hooda and lin laishram baby
Entertainment

रणदीप हुड्डाने ठेवलं लेकीचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 11, 2026 | 1:15 pm
Ajinkya Raut New Movie
Entertainment

‘ आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे’ चित्रपटाचा पोस्टर व म्युझिक लाँच सोहळा संपन्न; अजिंक्य राऊत मुख्य भूमिकेत

एप्रिल 11, 2026 | 1:01 pm
sreeleela recent remarks about periods
Entertainment

मासिक पाळीबाबत बोलणं अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकरी म्हणाले, “स्वतः डॉक्टर आहे, लाज वाटते का?”

एप्रिल 11, 2026 | 11:46 am
Taarak Mehta ka ooltah chashmah Actors Networth
Entertainment

‘तारक मेहता…’चा सर्वात श्रीमंत अभिनेता कोण? आत्माराम भिडे यांनी बबिता जींनाही टाकलं मागे, एकूण संपत्ती…

एप्रिल 11, 2026 | 10:35 am
Next Post
Ameesha Patel Replied To Trollers

"अमीषा खूपच म्हातारी वाटत आहे" वयावरून ट्रोल होताच अमीषा पटेलने केलं सडेतोड भाष्य, म्हणाली, "सनी देओलचं वय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.