सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे’ चित्रपटाचा पोस्टर व म्युझिक लाँच सोहळा संपन्न; अजिंक्य राऊत मुख्य भूमिकेत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 11, 2026 | 1:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ajinkya Raut New Movie

' आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे' चित्रपटाचा पोस्टर व म्युझिक लाँच सोहळा संपन्न; अजिंक्य राऊत मुख्य भूमिकेत

Ajinkya Raut New Movie : मुंबईतील ITC Grand Central परेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी ‘आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे’ (Out Of Syllabus) चित्रपटाचा पोस्टर आणि म्युझिक लाँच सोहळा अगदी दिमाखात पार पडला. मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रेरणादायी चित्रपटाची निर्मिती डॉ. सुगत जी. वाघमारे यांनी ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’च्या बॅनरखाली केली असून दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांनी केले आहे.

​या दिमाखदार सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने अभिनेते महेश मांजरेकर, वैशाली सामंत, गौरव मोरे, रोहित माने, शिवाली परब, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर, पॅडी कांबळे, कुणाल मेश्राम, अभय जोधपूरकर, सौरभ अभ्यंकर, गोपाळ गावंडे, मोहित कुलकर्णी, संजय पवार, अजिंक्य राऊत, मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, अद्वयी, अभिजित रामचंद्र, सानिका तोरस्कर आणि शेषपाल गणवीर या कलाकार मंडळींचा समावेश होता.

आणखी वाचा – मासिक पाळीबाबत बोलणं अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकरी म्हणाले, “स्वतः डॉक्टर आहे, लाज वाटते का?”

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

​’आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे’ या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढविली आहे. अभिनेता अजिंक्य राऊत आणि नवोदित अभिनेत्री अद्वयी ही एक फ्रेश जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. पोस्टरमध्ये दिसणारा ‘पुस्तकी अभ्यास करणारा नायक’ आणि ‘त्याच्याकडे पाहत बसलेली नायिका’ यामुळे कथेविषयी विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. केवळ पुस्तकी परीक्षेत उत्तीर्ण होण्यापेक्षा आयुष्याची परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्याची एक थरारक आणि प्रेरणादायी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’चा सर्वात श्रीमंत अभिनेता कोण? आत्माराम भिडे यांनी बबिता जींनाही टाकलं मागे, एकूण संपत्ती…

​या चित्रपटाची तांत्रिक बाजू अतिशय भक्कम असून चित्रपटाचे लेखन अनिकेत कोरडे यांनी केले आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांनी केले आहे. निर्माते डॉ. सुगत जी. वाघमारे यांनी ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’च्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. तांत्रिक नाविन्य जपत सचिन मनोहराराव ढोकणे यांनी चित्रपटाचे ‘AI क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून काम पाहिले आहे. तर संगीत दिग्दर्शक मोहित कुलकर्णी यांनी संगीताची धुरा सांभाळली असून, वैशाली सामंत, अभय जोधपूरकर आणि गोपाळ गावंडे यांनी गाण्यांना सुमधुर स्वर दिले आहेत. तर मनीष केदार व्यास, सुधीर वड्डेली यांनी छायांकनाची जबाबदारी पेलवली आहे. आणि संकलन अनिल विठ्ठल थोरात यांचे आहे. ​मुख्य भूमिकेत अजिंक्य राऊत, अद्वयी आणि शेषपाल गणवीर असून त्यांना सानिका तोरस्कर, अभिजित रामचंद्र, मिलिंद शिंदे आणि कमलेश सावंत यांची महत्त्वपूर्ण साथ लाभली आहे. ‘अदू-तिशू प्रॉडक्शन अँड म्युझिक’ प्रस्तुत हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Tags: ajinkya rautmarathi movieOut Of Syllabus
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
randeep hooda and lin laishram baby

रणदीप हुड्डाने ठेवलं लेकीचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.