‘आई कुठे काय करते’ या मालिकेने गेल्या काही दिवसांपासून टीआरपीमध्येही पहिल्या क्रमांकावर आपलं स्थान टिकवून ठेवले आहे. अरुंधतीच्या लग्नसोहळ्यामुळे मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. अनिरुद्ध-अरुंधती यांचा २५ वर्षांचा संसार अचानक मोडल्यानंतर एकत्र कुटुंबात राहणाऱ्या देशमुखांच्या घरात एका मागोमाग एक वादळं येतात. (aai kuthe kay karte update)
दरम्यान यांत भरडली जाणारी अरुंधती मात्र काळाच्या ओघात स्वतःत बदल घडवते. आता मालिकेत अरुंधतीच दुसरं लग्न उरकलं असल्याचं पाहायला मिळालं. अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न ठरल्यापासून काही ना काही विघ्न येतच होती. या आलेल्या संकटांवर मात करत अखेर दोघांचं लग्न पार पडलं आहे.
पहा अरुंधतीची पाठवणी करताना घरातल्यांची रिअक्शन – (aai kuthe kay karte update)
‘आई कुठे काय करते’ मालिकेने मागील काही दिवसांपासून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. मालिकेत आईचं म्हणजेच अरुंधतीच्या लग्नाचा ट्रक पाहायला मिळाला. मेहंदी, चुडा, संगीत, हळद या सगळ्या विधी धुमधडाक्यात पार पडला. घरातल्या सगळ्या मंडळींनी अगदी आनंदात अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची तयारी केली होती. अरुंधतीच कन्यादान कांचन आणि अप्पा यांनीच केलं. अप्पांनी या लग्नाला खूप सपोर्ट केला.

अरुंधतीच्या विरोधात बोलणारी, तिला सतत टोमणे मारणारी कांचन ही अखेर अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नासाठी तयार झाली. तर यशचा अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नात खारीचा वाटा आहे. आता अरुंधतीवर देशमुख कुटुंबाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. अरुंधतीची घरातून पाठवणी करण्यात आली आहे.(aai kuthe kay karte update)
====
हे देखील वाचा – ‘शीतली’ ते ‘अस्मि’ असा आहे शिवानीचा अभिनित प्रवास
====
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अरुंधतीची पाठवणी करतानाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ईशा, यश आणि अभि यांना देखील आईचा निरोप घेताना गहिवरून आलं आहे. पाठवणी वेळी अप्पा म्हणतात की, ‘आज लेकीची पाठवणी करतोय पण या घराचे दरवाजे तिच्यासाठी आणि तुमच्यासाठी कायमचे उघडे असतील. तिला सांभाळा असं म्हणून अप्पा आशुतोष समोर हात जोडतात. तर कांचनही म्हणते की, ‘आज अरुंधती या घरातून जात आहे, पण या घरातील तिचं स्थान दुसरं कोणीच घेऊ शकत नाही.’ असं म्हणून सगळेच आनंदाश्रू वाहत अरुंधतीला निरोप देताना दिसत आहेत.
